ऐश्वर्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता…, बच्चन कुटुंबियांचा ‘तो’ व्हिडीओ समोर, पुन्हा चर्चांना उधाण
Aishwarya Rai - Abhishek Bachchan: बच्चन कुटुंबियांवर पुन्हा ऐश्वर्याच्या चाहत्यांनी साधला निशाणा, 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण म्हणाले, 'ऐश्वर्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता...', सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबियांची चर्चा...

Aishwarya Rai – Abhishek Bachchan: 11 ऑगस्ट रोजी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा होस्ट करण्यात आलेला. सोहळ्यात अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्याच आलं. अभिनेता अभिषेक बच्चन याला देखील ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमासाठी बेस्ट अभिनेता पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आलं… पुरस्कार सोहळ्यात अभिषेक आई जया बच्चन, बहीण श्वेता नंदा नेवेली आणि भाची नव्या नंदा नवेली यांच्यासोबत उपस्थित राहिलेला.. पण अभिषेक याच्यासोबत यावेळी देखील पत्नी ऐश्वर्या राय आणि लेक आराध्या बच्चन नव्हती… ही गोष्ट चाहत्यांना खटकली आहे.
फिल्मफेअर अभिषेक बच्चन याचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एका व्हिडीओमध्ये अभिषेक त्याची आई, बहीण आणि भाचीसोबत प्रेक्षकांमध्ये बसला आहे. जेव्हा अभिषेकचं नाव सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत जाहीर करण्यात आलं, तेव्हा तो त्याने आईला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेकलं…
View this post on Instagram
वडील अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास परफॉर्मन्स
11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस देखील होता आणि याच निमित्ताने अभिषेक याने वडिलांसाठी खास परफॉर्मन्स देखील दिला… तर आईवर असलेलं प्रेम व्यक्त करताना अभिनेता दिसला. अभिषेक बच्चन यांच्या आयुष्यातील खास प्रसंगी ऐश्वर्या आणि आराध्या नसल्यामुळे चाहत्यांना वाईट वाटलं… ज्यामुळे ऐश्वर्याच्या चाहत्यांनी अभिषेक याला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्या आणि आराध्या कुठे आहे? – चाहत्यांचा प्रश्न
एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ऐश्वर्या कुठे आहे? तिला कधीच सामिल का केलं जात नाही… बच्चन कुटुंब बॉसी आहे का?’ दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ऐश्वर्या आणि आराध्या कुठे आहेत?’, ‘ऐश्वर्या शिवाय कुटुंब कधीच पूर्ण होणार नाही…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या देखील सोबत असयला हवी होती… आई आणि बहीण सोबत आहे चांगली गोष्ट आहे… पण पत्नी देखील सोबत हवी..’
अन्य एका चाहत्यांना मोठी खंत व्यक्त केली. ‘जेव्हा ऐश्वर्या हिला पोन्नियिन सेलवन (SIIMA आणि IIFA) सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला तेव्हा कोणीच तिच्यासोबत नव्हतं… आणि आता अभिषेकला सपोर्ट करत आहेत.’ एवढंच नाही तर, जया बच्चन यांच्यावर निशाणा साधत एक नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्याचं संपूर्ण करीयर उद्ध्वस्त केलं आणि येथे मुलीला घेऊन बसल्या आहेत…’, सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा सुरु आहे.
