
अभिनेत्री हिना खान ही मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हिना खान हिने आयुष्यात अत्यंत वाईट काळ बघितलाय. कॅन्सरचा सामना हिना खानने केला. हिना खानने अक्षराच्या भूमिकेतून अनेक वर्ष मोठ्या पडद्यावर काम केले. हिनाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळतंय. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच अनेक वर्ष डेट केल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न केले. हेच नाही तर तिच्या कॅन्सरच्या वाईट काळात बॉयफ्रेंड तिच्यासोबत होता.
हिना खानचा पती रॉकी जयस्वाल याला लोक टार्गेट करताना दिसत आहेत. आता त्याने एका मुलाखतीत यावर थेट भाष्य केले. लोक मला म्हणतात की, मी जीवनात सर्वकाही मिळवण्यासाठी हिनाचे पद, पैसा आणि स्टेटसचा फायदा घेतला आहे. मुळात म्हणजे मला हेच कळत नाही की, हे सर्व येते नेमके कुठून? त्या लोकांना या चर्चा करून काय मिळवायचे आहे. मी खर सांगतो की, मी जे काही कमावत आहे ते हिना इतके नक्कीच नाहीये. ती स्वत: मध्येच एक स्टार आहे.
मला हिना खान स्टार असण्याचा फायदा मिळालाय? हो…अगदी खरे आहे. पण आम्ही याच्यामुळे एकत्र आहोत? अजिबातच नाही. मला कोणतीही असुरक्षितता नाही. मुळात म्हणजे मला माहिती आहे की, मी हिनासोबत गेलो की, मला एक वेगळी सुविधा दिली जाते. ती सोबत असली की, एक वेगळाच सन्मान मिळतो. मी नाराज का होऊ? बाकी काहीही होऊ..मला एकच गोष्ट माहिती आहे की, मी त्या व्यक्तीवर खूप जास्त प्रेम करतो. माझ्यासाठी एकच गोष्ट आयुष्यात अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे त्या व्यक्तीचा वेळ.
हिना खानला कॅन्सर झाला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ज्यावेळी हिनावर केमो सुरू होते, त्यावेळी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेताना अनेकदा रॉकी दिसला. विशेष म्हणजे हिनाला कॅन्सरची लागण झाल्यानंतर रॉकीने तिच्यासोबत लग्न केले. पहिल्यांदाच रॉकी हा हिना खान आणि त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसला आहे. हिना खान ही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.