Kangana Ranaut : विजय-तृषा डेटिंगच्या चर्चेत कंगना रानौतची एन्ट्री; भडकून म्हणाल्या..
Kangana Ranaut Support Trisha Krishnan : बॉलीवूड अभिनेत्री , खासदार कंगना रानौतने साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनला पाठिंबा दिला आहे. तृषाला ट्रोल करत तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. कंगना यांनी या प्रवृत्तीचा निषेध करत, यशस्वी महिलांनाच कसं लक्ष्य केलं जाते, याबद्दल सांगितलं.

Kangana Ranaut Support Trisha Krishnan: बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत (Kangana Ranaut ) या बिनधास्त अंदासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्या बऱ्याचशा मुद्यांवर अनेकदा त्यांचं मत व्यक्त करतात. बऱ्याच वेळा असं होतं की त्यांच्या वक्तव्यांवर बरीच टीका होते, त्यांना ट्रोलही केलं जातं. पण त्या बोलत असतात. आता कंगना रानौत पुन्हा चर्चेत आल्या आहेत. साऊथची अभिनेत्री तृषा कृष्णन हिला त्यांनी सपोर्ट केला आहे. तृषा कृ्ष्णन आणइ सीए थलपती विजय यांच्या नात्याबद्दल, डेटिंगबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. अनेका लोकांनी तृषा हिला ट्रोलही केलं, तिच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले. याच दरम्यान कंगना यांनी तृषा यांचा बचाव करत तिला ट्रोल करणाऱ्याना चोख प्रत्युत्तर दिलंय.
कंगना रनौत यांनी तृषाचा थेट नावं न घेताच, तिच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं.’तमिळनाडूमध्ये जे काही घडलं ते तुम्ही पाहिलंय. या प्रकरणात एक अत्यंत प्रतिष्ठित कलाकार आणि अभिनेत्री सहभागी होत्या. हे नातं दोन्ही बाजूंनी होतं. मात्र, जेव्हा शिवीगाळ किंवा एखाद्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्याची वेळ येते, तेव्हा नेहमी महिलेलाच टार्गेट केलं जातं’ असं कंगना यांनी म्हटलं.
कंगना यांनी घेतली तृषाची बाजू
महिलांना लक्ष्य करण्याची ही प्रवृत्ती केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर जगभरात पाहायला मिळते, असं कंगना यांनी पुढे सांगितलं. काम करणाऱ्या महिला, यशस्वी महिला, अभिनेत्री, राजकारणी तसेच सत्ता किंवा मोठ्या पदावर असलेल्या महिलांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना कमकुवत करण्याचा आणि समाजात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो,असंही त्यांनी नमूद केलं.
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर वादाला फुटलं तोंड
खरंतर, कावेरी नदीच्या पाण्याचा वाद आणि कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित मेकेदाटू प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तंजावर येथे डीएमकेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी उदयनिधि स्टॅलिन यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका केली. दरम्यान, जमावातून तृषाचं नाव घेतलं जात असताना उदयनिधी यांनी तमिळ भाषेत एक टिप्पणी केली. तिचा साधारण अर्थ असा होता की, “पाणी कुठूनही येवो किंवा न येवो, तिथे पाणी पोहोचलेच पाहिजे.” मात्र या वक्तव्याचा संदर्भ कावेरीच्या पाण्याशी असल्याचं त्यांनी नंतर स्पष्ट केलं.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. तमिळगा वेत्री कळघम (TVK) यांनी उदयनिधी यांच्यावर सार्वजनिक व्यासपीठावरून एका महिलेविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला. या प्रकरणाने गंभीर वळण घेतल्यानंतर 4 ऑगस्ट रोजी उदयनिधी स्टॅलिन यांना चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली. त्यांच्या भाषणासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.