कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव

'हेट स्टोरी 2'च्या कास्टिंगवेळी आलेल्या धक्कादायक अनुभवाने अभिनेत्री हादरली. तिच्याकडे नको ती मागणी करण्यात आली.

कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा हादरवणारा अनुभव
| Updated on: Aug 25, 2026 | 3:42 PM

‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आणि इतर चित्रपट तसेच वेब-सीरिजमध्ये काम केलेली अभिनेत्री कंगना शर्मा ही तिच्या चित्रपटांपेक्षा ग्लॅमरस अंदाज, स्टाईलसाठी जास्त ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं. कंगना हिने ‘हेट स्टोरी 2’च्या कास्टिंगदरम्यान आलेल्या एका धक्कादायक प्रसंगाची आठवण सांगितली. कास्टिंगच्या नावाखाली आपल्याकडे नको ती घाणेरडी मागणी करण्यात आल्याचं तिने नमूद केलं.

तू किती बोल्ड आहेस ?

सिद्धार्थ कन्नन याच्याशी संवाद साधताना कंगनाने तिला आलेला, अस्वस्थ करणारा अनुभव सांगितला. ‘हेट स्टोरी 2’च्या कास्टिंगसाठी ती एका कास्टिंग एजन्सीच्या लोकांना रेस्टॉरंटमध्ये भेटाला गेली होती. मात्र तेव्हा तिला वेगळाच प्रश्न विचारण्यात आला. तू किती बोल्ड आहे, मोठ्या पडद्यावर तू किती बोल्ड भूमिका करू शकतेस? असं मला विचारण्यात आल्याचं कंगनाने सांगितलं.

मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. ‘तुझी पँटी काढून मला दे’ असं मला सांगण्यात आलं, असा धक्कादायक दावाही कंगनाने यावेळी केला. ‘ हेट स्टोरी 2’चं कास्टिंग सुरू होतं आणि त्यासाठी एक एजन्सी होती. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. त्यांनी ( त्या लोकांनी) मला विचारलं, तू किती बोल्ड आहेस ? मी म्हटलं, ‘जर अभिनयाचा विषय असेल तर तुम्ही माझ्याकडून काहीही करून घेऊ शकता. मानसिकदृष्ट्या मी इतकी बोल्ड आहे.’   मात्र त्यावर तिथल्या इसमाने तिला जे सांगितलं ते हादरवणार होतं. पुढे तो (इसम) म्हणाला ‘तुझी पँटी काढून मला दे.’ असं कंगनाने सांगितलं.

त्याचं बोलणं ऐकून कंगना चांगलीच संतापली आणि तिने त्याला विचारलं की, ‘आत्ता (मार) खाणार की बाहेर जाऊन खाणार? ’ असं म्हणत तिने त्याला फटकारलं. मात्र एवढं होऊनही तो काही शांत बसला नाही, उलट तो तिला म्हणाला, ‘अरे, मी तर फक्त हे बघत होतो की तू किती बोल्ड आहेस’ असं म्हणत त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे कंगनाने सांगितलं. तिला आलेल्या या धक्कादायक अनुभवाने अभिनेत्री चांगलीच हादरली होती. ‘ लोकांची अशी मेटॅलिटी असते. मानसिकदृष्ट्या तुम्ही अशा प्रकारे सक्षम असता, पण हे तुमच्या हातात असतं. कास्टिंग काउच कुठे नसतं ? कोणताही उद्योग सुरक्षित नाही. कॉर्पोरेट क्षेत्राचं उदाहरण घ्या” असंही कंगना पुढे म्हणाली.

बालपण गेलं कठीण

यावेळी बोलताना कंगनान तिने बालपणीच्या कठीण काळाबद्दलही सांगितलं. आमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि अगदी मूलभूत गरजा पूर्ण करणंही कठीण होतं, असा दावा तिने केला. एवढंच नव्हे तर लहानपणी एका नातेवाईकाने माझं शोषण केलं होतं, पण कुटुंबियांना त्याबद्दल माहीत नव्हतं, असंही ती म्हणाली.

कंगना शर्मा ही ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘दुल्ला भट्टी’, ‘राम रतन’, ‘युसेड’, ‘मोना होम डिलिव्हरी’ आणि ‘लेट्स प्ले ब्लाइंड’ या सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.

Follow Us