AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘आलं पिंजऱ्यामध्ये पिरतीचं पाखरू, चांदण्या रातीला थरथरलं घुंगरू’, पाहा माधुरीची ठसकेबाज लावणी!

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ यात ‘वहिनीसाहेब’ अर्थात ‘नंदिता’ची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. केवळ मालिकाच नव्हे, तर ‘युवा डान्सिंग क्वीन’ आणि ‘टिक टॉक’च्या माध्यमातून तिने बरीच फॅन फॉलोइंग मिळवली आहे.

Video | ‘आलं पिंजऱ्यामध्ये पिरतीचं पाखरू, चांदण्या रातीला थरथरलं घुंगरू’, पाहा माधुरीची ठसकेबाज लावणी!
माधुरी पवार
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 10:40 AM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ यात ‘वहिनीसाहेब’ अर्थात ‘नंदिता’ची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. केवळ मालिकाच नव्हे, तर ‘युवा डान्सिंग क्वीन’ आणि ‘टिक टॉक’च्या माध्यमातून तिने बरीच फॅन फॉलोइंग मिळवली आहे. माधुरी पवार सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून, आपल्या डान्सचे व्हिडीओ आणि फोटोज शेअर करत असते (Actress Madhuri Pawar share lavani dance video on social media).

आपल्या लावणी नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने नुकताच एक ठसकेबाज लावणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘आलं पिंजऱ्यामध्ये पिरतीचं पाखरू, चांदण्या रातीला थरथरलं घुंगरू’ या गाण्यावर माधुरीने ठेका धरला आहे. सध्या सलवार कुर्तामध्ये तिने ही ठसकेबाज लावणी सादर केली आहे. चाहते तिच्या या व्हिडीओवर भरभरून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ :

केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर, सोशल मीडियावर देखील माधुरीच्या नावाची मोठी चर्चा असते. तिचे अनेक डान्स व्हिडीओज सोशल मीडियावर चर्चेत असतात. तिच्या डान्स व्हिडीओमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते.

मालिकेत नेहमीच ‘खाष्ट’ भूमिकेत दिसणाऱ्या माधुरीच्या या अदा पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. याच कारणाने माधुरी सध्या अनेक इव्हेंटसाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी अनेकांची पसंती ठरत आहे. माधुरीने या अगोदरही छोट्यापडद्यावर काम केलं आहे. ‘झी युवा’ वरील ‘अप्सरा आली’ या डान्स शो आपल्या नृत्याचे  जलवे दाखत ती विजेती ठरली होती (Actress Madhuri Pawar share lavani dance video on social media).

‘तुझ्यात जीव रंगला’ने दिली खरी ओळख!

मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची (Nandita Vahini) खलनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले होते. मध्यंतरीच्या काळात कथानकाप्रमाणे या वहिनी साहेबांची तुरुंगात रवानगी झाली होती. ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांनी मालिकेत पुन्हा एंट्री घेतल्यावर आता नव्या वहिनीसाहेब कोण असणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होतीच.

एकीकडे या मालिका शेवटच्या टप्प्यात होती. तर प्रेक्षक देखील वहिनीसाहेबांना मिस करत होते. प्रेक्षकांची हीच उत्सुकता लक्षात घेता माधुरीच्या रुपात ‘नंदिता वहिनी’ची मालिकेत पुन्हा एकदा दमदार एंट्री झाली होती. धनश्री काडगावकरने मालिकेला गुडबाय म्हटल्याने ही भूमिका माधुरीकडे आली. या पात्राचं वेगळेपण जपत माधुरी देखील प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरांत पोहोचली.

(Actress Madhuri Pawar share lavani dance video on social media)

हेही वाचा :

‘आईने झूठें हैं, सच्ची तस्वीरे हैं!’, घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीला ओळखणंही मुश्किल!

Video | ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने सोशल मीडियावर शेअर केला योगा व्हिडीओ, पाहून चाहते म्हणतायत…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.