AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | कंगना रनौतकडे काम नाही, म्हणाली ‘मागच्या वर्षीचा अर्धा कर भरलाच नाही’!

बॉलिवूडची ‘काँट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या बेधडक बोलण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता कंगनाने अलीकडेच असे सांगितले आहे की, तिच्याकडे कामच नसल्याने गेल्या वर्षीचा निम्मा कर तिने भरलेला नाही.

Kangana Ranaut | कंगना रनौतकडे काम नाही, म्हणाली ‘मागच्या वर्षीचा अर्धा कर भरलाच नाही’!
कंगना राणावत
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 2:46 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘काँट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या बेधडक बोलण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता कंगनाने अलीकडेच असे सांगितले आहे की, तिच्याकडे कामच नसल्याने गेल्या वर्षीचा निम्मा कर तिने भरलेला नाही. कंगनाने असेही म्हटले आहे की, पहिल्यांदाच तिला कर भरण्यास उशीर झाला आहे. याबद्दल कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट करत सांगितले आहे (Kangana Ranaut said she has not paid half tax of last year due to no work).

कंगनाने लिहिले की, ‘मी माझ्या उत्पन्नातील 45 टक्के कर भरून सर्वात जास्त कर भरणाऱ्या स्लॅबमध्ये येते. मी सर्वाधिक कर देणारी अभिनेत्री आहे, परंतु काम नसल्यामुळे मी मागील वर्षाचा अर्धा कर भरलेला नाही.’ कंगना पुढे म्हणाली की, ‘मी माझा कर भरण्यास उशीर केला, असे हे पहिल्यांदाच घडले आहे. परंतु, माझ्या प्रलंबित करांच्या पैशांवरही सरकार व्याज शुल्क आकारत आहे.’

कंगना रनौत नुकतीच तिच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये गेली होती, जी बीएमसीने काही महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधकाम प्रकरणी तोडले होते. यादरम्यान, जेव्हा पापाराझीने तिला पोझ देण्यास सांगितले. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मला माझे काम करु द्या.

कोरोनाची लागण

मे महिन्यात कंगना कोरोनाच्या विळख्यात अडकली होती. तिने स्वत:ला घरातच अलग केले होते. कोरोनाविषयी बोलताना कंगनाने म्हटले होते की, हा फक्त एक सामान्य फ्लू आहे आणि मी त्याचा नक्कीच अंत करेन. मात्र, या विधानामुळे कंगना बरीच ट्रोल झाली होती (Kangana Ranaut said she has not paid half tax of last year due to no work).

मग, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, माझा रिपोर्ट नकारात्मक आला आहे आणि कोरोनाविरोधात मी कसा लढा दिला हे मी तुम्हाला सांगू इच्छिते, परंतु मला असे सांगण्यात आले आहे की, कोरोनाच्या चाहत्यांना राग येईल. होय, असे बरेच लोक आहेत ज्यांना कोरोना विरुद्ध बोलताना वाईट वाटते.

ट्विटर अकाऊंट निलंबित

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचे ट्विटर अकाऊंट नुकतेच निलंबित करण्यात आले होते, असे असूनही ती सोशल मीडियावर सक्रिय राहिली आहे. आता आपले विचार शेअर करण्यासाठी कंगनाने इन्स्टाग्रामचा आधार घेतला आहे. इस्त्राईल-पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्ये (Israel Palestine issue) कंगनाने सोशल मीडियावर इस्रायलचे समर्थन होते.

‘थलायवी’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कंगनाच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, ती लवकरच ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत नेत्या जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, जो खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रत्येकजण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

(Kangana Ranaut said she has not paid half tax of last year due to no work)

हेही वाचा :

Happy Birthday Sonam Kapoor | बॉलिवूडची ‘फॅशन आयकॉन’ सोनम कपूर, पाहा पती आनंद आहुजासोबतचे खास रोमँटिक क्षण!

‘या’ 5 वेब सिरीजमुळे भारतीय मनोरंजन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.