कॅन्सरवर मात करणाऱ्या अभिनेत्री मनिषा कोईरालाकडे इतक्या कोटींची संपत्ती, आजोबा होते पंतप्रधान
अभिनेत्री मनिषा कोईराला हिने आपल्या अभिनयातून नेपाळमधल्याच नाही तर भारतीय लोकांची ही मने जिंकली आहेत. बॉलिवूडमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, तिने हिंदीच नाही तर इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. पण या दरम्यान तिची संपत्ती कितीये तुम्हाला माहितीये.

Manisha Koirala Net worth : नेपाळी वंशाची बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा जन्म नेपाळमधील राजकीय कुटुंबात झालाय. 53 वर्षीय मनीषाची अभिनेत्री म्हणून कारकीर्द खूपच चांगली राहिली आहे. अभिनेत्री मनिषा कोईरालाने तिच्या करिअरची सुरुवात नेपाळी चित्रपट ‘फेरी भेतौला’मधून केली होती. त्यानंतर तिने ‘सौदागर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने फक्त नेपाळी आणि हिंदीच सिनेमा केले नाहीत तर तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिने काम केले.
कॅन्सरवर केली मात
मनीषा कोईरालाच्या आयुष्यातही एक वाईट टप्पा देखील आला होता. 2012 मध्ये अभिनेत्रीला गर्भाशयाचा कर्करोग झाला. पण तिने कॅन्सरसमोर हार नाही मानली.
कॅन्सरशी लढा देण्यासाठी मनीषा कोईराला काठमांडूहून मुंबईत आली. मुंबईत काही दिवस तिने उपचार घेतले. त्यानंतर पुन्हा उपचारासाठी तिला अमेरिकेला ही जावे लागले. चार वर्ष उपचार घेतल्यानंतर तिने अखेर कॅन्सरवर मात केली. कॅन्सरवर मात केल्यानंतर तिने पुन्हा एकदा 2015 मध्ये ‘चेहरे’ या बॉलिवूड चित्रपटातून पुनरागमन केले. तेव्हापासून ती चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.
मनिषा कोईरालाची संपत्ती किती
अभिनेत्री मनिषा कोईरालाची एकूण संपत्ती ही मीडिया रिपोर्ट्सनुसार 80 ते 90 कोटींची आहे. पण भारतासह नेपाळमध्येही तिची बरीच मालमत्ता आहे.मनीषाच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे चित्रपट. चित्रपटांव्यतिरिक्त ती जाहिराती आणि ब्रँड प्रमोशनमधूनही चांगली कमाई करते.
अभिनेत्री मनिषा कोईराला ही लक्झरी कारची ही शौकीन आहे. तिच्याकडे ऑडी Q7 आणि रेंज रोव्हर सारख्या महागड्या गाड्या आहेत.
अभिनेत्रीने अलीकडेच शहजादा या चित्रपटात काम केले होते. ज्यामध्ये तिने अभिनेता कार्तिक आर्यनच्या आईची भूमिका साकारली होती. लवकरच ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या चित्रपटात दिसणार आहे.
मनीषा कोईरालाचा जन्म काठमांडूमध्ये झाला होता. तिचे वडील प्रकाश कोईराला हे माजी पर्यावरण मंत्री आहेत. तिला एक भाऊ देखील आहे. ज्याचे नाव सिद्धार्थ कोईराला आहे. तो देखील एक अभिनेता आहे.
अजोबा आणि काका होते पंतप्रधान
मनिषा कोईरालाचे आजोबा बिश्वेश्वर प्रसाद कोईराला आणि तिचे दोन काका, गिरिजा प्रसाद कोईराला आणि मातृका प्रसाद कोईराला हे नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत. तिच्या कुटुंबातील बऱ्याच व्यक्ती राजकारणात सक्रीय आहेत.
