AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नम्रता मल्लाचं नवीन गाणं रिलीज, बोल्ड स्टेपने लावलं चाहत्यांना वेड, ऐकताच लोक धरत आहेत ठेका

बोल्ड अभिनेत्रीचं 3 मिनिट 41 सेकंदाचं नवीन गाणं रिलीज. तिच्या बोल्ड डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांना केलं आकर्षित. प्रत्येक स्टेपची होतेय चर्चा.

नम्रता मल्लाचं नवीन गाणं रिलीज, बोल्ड स्टेपने लावलं चाहत्यांना वेड, ऐकताच लोक धरत आहेत ठेका
Image Credit source: Social media
| Updated on: May 08, 2026 | 12:52 PM
Share

भोजपुरी संगीतविश्वातील लोकप्रिय गायिका शिल्पी राज हिने आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. डान्स नंबर असो किंवा भावनिक गाणी, शिल्पी राजने प्रत्येक शैलीत आपली छाप सोडली आहे. आता तिचं नवं भोजपुरी गाणं छोड़ा शराब रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या गाण्यात अभिनेत्री नम्रता मल्ला हिच्या बोल्ड अदांनी आणि जबरदस्त डान्स मूव्ह्जने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. गाणं रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हजारो व्ह्यूज मिळवत ते वेगाने व्हायरल होत आहे.

नम्रता मल्लाचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

छोड़ा शराब हे गाणं भोजपुरी म्युझिकप्रेमींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. हे गाणं Saregama Hum Bhojpuri या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलं आहे. सुमारे 3 मिनिटे 41 सेकंदांच्या या गाण्यात नम्रता मल्ला तिच्या ग्लॅमरस लूक, एक्स्प्रेशन्स आणि बोल्ड डान्स स्टेप्समुळे विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिच्या प्रत्येक अदेतून आत्मविश्वास आणि ग्लॅमर झळकत असल्याने चाहत्यांकडून गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

7 मे 2026 रोजी रिलीज झालेल्या या गाण्याने काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. सोशल मीडियावरही या गाण्याच्या क्लिप्स मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत.

रोमांस, डान्स आणि खट्याळपणाचा तडका

गाण्याच्या बोलांमध्ये रोमँटिक अंदाजासोबत हलकाफुलका खट्याळपणाही पाहायला मिळतो आहे. गाण्यात नम्रता मल्ला आपल्या अदांनी नायकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसते. दारू सोडून प्रेमाची नशा अनुभव असा संदेश या गाण्यात मजेशीर पद्धतीने मांडण्यात आला आहे. शिल्पी राजच्या आवाजामुळे गाण्याला वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. तिच्या दमदार गायकीमुळे प्रेक्षकांना या गाण्यावर ठेका धरल्याशिवाय राहवत नाही.

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये शिल्पी राजने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आता ‘छोड़ा शराब’मधून पुन्हा एकदा शिल्पी राज आणि नम्रता मल्ला यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून हे गाणं आगामी दिवसांत आणखी मोठा रेकॉर्ड करू शकतं अशी चर्चा भोजपुरी संगीतप्रेमींमध्ये सुरू आहे.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा