
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे नोरा फतेही ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसत आहे. नोरा फतेही हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर नोरा फतेही ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील आली होती. नोरा फतेही हिला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने अत्यंत महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले जाते. मुळात म्हणजे हे तर स्पष्ट आहे की, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही तिचे पाय खोलात आहेत. कारण सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिची बऱ्याच वेळा चाैकशी करण्यात आलीये. सुकेश चंद्रशेखर याच्या संपर्कात नोरा होती, असेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच नोरा फतेही हिने स्पष्ट केले की, तिचे आणि सुकेश चंद्रशेखर याचे काहीच संबंध नव्हते. इतकेच नाही तर सुकेश चंद्रशेखर याने आपल्याला कोणतेच गिफ्ट वगैरे दिले नसल्याचे देखील नोरा फतेही हिने सांगितले. नोरा फतेही काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याच्यासोबत धमाकेदार डान्स करताना विदेशात दिसली होती.
नोरा फतेही हिच्या हाती आता साऊथचा एक मोठा चित्रपट लागला आहे. विशेष म्हणजे थेट वरुण तेज याच्यासोबत काम करण्याची संधी ही नोरा फतेही हिला मिळालीये. पहिल्यांदाच नोरा फतेही ही वरुण तेज याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. या बातमीनंतर आता नोरा फतेही हिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
विशेष म्हणजे हे पहिल्यांदाच नाही की, नोरा फतेही हिला कोणता साऊथचा चित्रपट मिळाला म्हणून. यापूर्वी बाॅलिवूड चित्रपटांसोबत नोरा फतेही हिने साऊथच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नोरा फतेही आणि वरुण तेज यांच्या चित्रपटाचे नाव अजून कळू शकले नाहीये. हा चित्रपट करुणा कुमार निर्देशन करणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे.
या चित्रपटात नोरा फतेही ही महत्वाच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर नोरा फतेही हिच्या डान्सचा तडका चित्रपटामध्ये बसणार आहे. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची मोठी आतुरता ही बघायला मिळत आहे. नोरा फतेही हिचा मुंबईतील एका शोमधील व्हिडीओ तूफान व्हायरल झाला होता. यामध्ये नोरा फतेही साडीमध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसत होती.