AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीला पाठवल्या न्यूड क्लिप्स, व्हिडीओ पाहून…अश्लील प्रकार पाहून हिरोईन हादरली!

प्रसिद्ध अभिनेत्री पूनम दासगुप्ता यांनी नुकतीच मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात सायबर छळाची तक्रार दाखल केली आहे. त्यांना एका अनोळखी व्हॉट्सॲप नंबरवरून अश्लील व्हिडीओ आणि फोटो मिळाले.

अभिनेत्रीला पाठवल्या न्यूड क्लिप्स, व्हिडीओ पाहून...अश्लील प्रकार पाहून हिरोईन हादरली!
Poonam DasguptaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 02, 2026 | 5:51 PM
Share

३० वर्षांपूर्वी आलेल्या ‘पापी गुडिया’ या गाजलेल्या हॉरर चित्रपटातील अभिनेत्री पूनम दासगुप्ता यांनी मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्याला व्हॉट्सॲपवर सतत अश्लील व्हिडीओ आणि नग्न फोटो पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप अभिनेत्रीने केला आहे. ही घटना 27 एप्रिल रोजी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास घडली. त्यावेळी अभिनेत्री घरात होत्या.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम दासगुप्ता यांना काही अनोळखी क्रमांकांवरून आक्षेपार्ह मजकूर पाठवला जात होता. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, मात्र जेव्हा हा त्रास वाढतच गेला, तेव्हा त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीच्या मते, अशा कृत्यांमुळे केवळ त्यांच्या गोपनीयतेचा (Privacy) भंग होत नाही, तर हा मानसिक छळाचाही प्रकार आहे. त्यांनी पोलिसांना त्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट दिले असून, पोलिसांनी पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

व्हॉट्सॲपवर आले अश्लील व्हिडीओ

पूनम दासगुप्ता यांनी आपल्या पतीसोबत या विषयावर चर्चा केल्यानंतर २९ एप्रिल रोजी ओशिवारा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली. पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिते’च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला असून, त्या अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकामागील व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ओळखीच्या व्यक्तीवर संशय

अभिनेत्रीने असाही आरोप केला आहे की, संबंधित व्यक्तीने तिचे अनेक जुने फोटो देखील पसरवले आहेत. “ते फोटो आता गुगलवर किंवा सार्वजनिकरीत्या कुठेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा त्रास देणारा माणूस माझ्या ओळखीचाच असावा आणि तो मुद्दाम मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असावा,” असा संशय पूनम दासगुप्ता यांनी व्यक्त केला आहे.

कोण आहेत पूनम दासगुप्ता?

पूनम दासगुप्ता यांनी बंगाली सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी हिंदीसह मल्याळम, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘पापी गुडिया’मधील त्यांच्या भूमिकेची मोठी चर्चा झाली होती.

Follow Us
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा