AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुभमन गिलचा एक निर्णय अन् अफगाण संघात शांतता; तिसऱ्या मॅचमध्ये जे घडलं ते पाहण्यासारखं

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज सुरु आहे. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली.

शुभमन गिलचा एक निर्णय अन् अफगाण संघात शांतता; तिसऱ्या मॅचमध्ये जे घडलं ते पाहण्यासारखं
prasiddh krishna
| Updated on: Jun 20, 2026 | 3:39 PM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा चेन्नईमध्ये आज सुरु आहे. यापूर्वी दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले. दोन्ही सामने जिंकल्यामुळे आता भारतीय संघाने या मालिकेत आघाडी घेतली आहे. तिसरा सामना जिंकताच भारतीय संघ मालिका क्लीन स्वीप पूर्ण करेल. आता या तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहे. तिसऱ्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान मिळाले आणि त्याने त्याचा सोनंही केले. प्रसिद्धने अफगाणिस्तानच्या चार विकेट काढल्या पण त्याला साथ मिळाली ती रोहित शर्माची.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर संघातून वगळण्यात आलेल्या प्रसिद्ध कृष्णाला तिसऱ्या सामन्यात संघात परतण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेत तीन षटकांत तीन फलंदाजांना बाद केले. या तिन्ही वेळी त्याला रोहित शर्माची साथ मिळाली. त्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवत तिन्ही झेल घेतले. या तीन विकेट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध कृष्णाने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर रहमानुल्ला गुरबाजला बाद केले. गुरबाजने फुल-लेंथ चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची बाहेरील कड घेऊन स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. त्यानंतर त्याने रहमत शाह (5) आणि इब्राहिम झद्रान (11) यांनाही त्याच पद्धतीने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकरवी झेलबाद केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजाच्या जोडीने एकाच पद्धतीने सलग तीन फलंदाजांना बाद करणे हे दुर्मिळ आहे. त्यामुळे रोहित आणि प्रसिद्धची जोडी जमली आणि त्यांनी अफगाण संघाची वाट लावली.

या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल केले आहेत. के एल राहुल, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांना संघातून वगळण्यात आले आहे. तर नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे आणि प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली आहे. प्रसिद्धने तर आपल्या गोलंदाजीने चमत्कार केला आता इतर दोन गोलंदाज काय करिष्मा करतात याकडे सर्वांच्या नजरा असतील.

Follow Us
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा