AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG 3rd Odi: टीम इंडियामध्ये आश्चर्यकारक बदल; ज्याची भीती होती अखेर तेच घडलं, कोण आऊट?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे अफगाणिस्तानने जिंकली आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. आता या सामन्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये भारतीय संघाने तब्बल तीन बदल केले आहे.

IND vs AFG 3rd Odi: टीम इंडियामध्ये आश्चर्यकारक बदल; ज्याची भीती होती अखेर तेच घडलं, कोण आऊट?
ind vs afg 3rd odi
| Updated on: Jun 20, 2026 | 1:34 PM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. अफगाणिस्तानने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आहेत, तर भारतीय संघानेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. भारतीय संघ व्यवस्थापनाने हर्ष दुबे, प्रसिद्ध कृष्णा आणि नितीश रेड्डी यांना या सामन्यात संधी दिली आहे. केएल राहुल, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग या सामन्यात खेळत नाहीत.

बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या हर्षित राणालाही या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तर कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. त्याचा परफॉर्मन्स पाहता ही भीती होतीच पण अखेर ती खरी ठरली. हर्षित राणाला या शेवटच्या सामन्यात संधी मिळेल असे वाटत होते पण तसे काही झाले नाही. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नाणेफेकीवेळी कर्णधार शुभमन गिल म्हणाला, “खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे. जर आम्ही नाणेफेक जिंकलो असतो, तर आम्ही प्रथम फलंदाजी केली असती. मागील सामन्यात उष्णता अधिक होतील आणि आज हवामानही तसेच राहण्याची शक्यता आहे. ज्या क्षेत्रांवर आम्ही काम करत आहोत, त्यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्यावर आमचे लक्ष आहे. धावांचा पाठलाग करणे हे एक असे क्षेत्र आहे जिथे आम्ही अद्याप चांगली कामगिरी केलेली नाही.”

भारतीय संघाने आतापर्यंत मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांवर वर्चस्व गाजवले आहे. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या त्या सामन्यात भारतीय संघासाठी शुभमन गिलने 66 चेंडूंमध्ये 84 धावांची नाबाद खेळी केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अफगाण संघाचा 170 धावांनी एकतर्फी पराभव केला. त्या सामन्यात भारतीय संघासाठी इशान किशन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी शानदार शतके झळकावली.

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ

भारत- यशस्वी जायसवाल, रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), ईशान किशन, श्रेयस अय्यर, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव

अफगानिस्तान- रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, मोहम्मद नबी, रहमत शाह, डार्विश रसूली, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्लाह ओमरजाई, राशिद खान, अल्लाह गजनफर, जियाउर्र रहमान, फरीद मलिक

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत