AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगला परफॉर्मन्स कर अन्यथा…मॅचविनरला कोचकडून थेट वॉर्निंग; संघातून हकालपट्टी पक्की

भारतीय संघाचे असिस्टंट कोच रायन टेन डोशेट यांनी आता संघ निवडीबाबत एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे. संघात त्यालाच स्थान मिळणार ज्याचा खेळ चांगला असणार.

चांगला परफॉर्मन्स कर अन्यथा...मॅचविनरला कोचकडून थेट वॉर्निंग; संघातून हकालपट्टी पक्की
kuldeep yadav
| Updated on: Jun 20, 2026 | 11:13 AM
Share

भारतीय क्रिकेट संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. ही मालिका भारताच्या 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीची सुरुवात मानली जात आहे. येथून पुढे प्रत्येक सामन्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांचे संघातील स्थान पक्के होईल.  2027 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार की नाही याबद्दलही अजून शाश्वती नाही. आता यातच भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी एका खेळाडूला वॉर्निंग दिली आहे. जर कामगिरी चांगली केली नाही तर सरळ संघातून वगळले जाईल असा इशारा दिला आहे.

कुलदीप यादवचा फॉर्म सध्या भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे सहाय्यक प्रशिक्षक, रायन टेन डोशेट यांनी कुलदीपबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला जर संघात जागा मिळवायची असेल तर फॉर्मात येणे आवश्यक आहे.

आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे कुलदीपला, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या भारताच्या टी-20 संघात त्याला स्थान मिळाले नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी, टेन डोशेट म्हणाले, “त्याने मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. तो काही काळापासून सातत्याने खेळलेला नाही, अगदी कसोटी सामन्यांमध्येही नाही. त्याच्याबद्दल कोणतीही चिंता नाही पण त्याने पुनरागमन करावे.” धरमशाला येथील पहिला सामना चुकवल्यानंतर, लखनौ येथील दुसऱ्या सामन्यातही त्याला एकही बळी घेता आला नाही.

टेन डोशेट म्हणाले, “आम्हाला संघात नेहमीच एक मिस्ट्री स्पिनर हवा असतो. पण ज्या प्रकारे खेळ बदलत आहे आणि फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध इतके चांगले खेळत आहेत, त्यामुळे फिरकी गोलंदाजांना वेळोवेळी नवनवीन प्रयोग करावे लागतील. कुलदीप आणि इतर फिरकी गोलंदाजांनाही. भारतीय संघाचे स्पिनर कोच साईराज बहुतुले यांना त्यांच्यावर काम करावे लागेल. संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येकामध्ये स्पर्धा आहे. संघाची निवड नेहमी विशिष्ट भूमिका आणि संतुलन लक्षात घेऊन केली जाते.”

ते पुढे म्हणाले, “मला कुलदीपच्या प्रतिभेबद्दल शंका नाही, पण संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू शर्यतीत आहेत. त्याला सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करण्याची गरज आहे.”

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी