AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG 3rd Odi मॅचमध्ये कॅप्टन गिल आणि इशान खेळणार की नाही? टीम इंडियाच्या कोचकडून अपडेट समोर

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे असिस्टंट कोच रायन टेन डोशेट यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

IND vs AFG 3rd Odi मॅचमध्ये कॅप्टन गिल आणि इशान खेळणार की नाही? टीम इंडियाच्या कोचकडून अपडेट समोर
shubman gill and ishan kishan
| Updated on: Jun 20, 2026 | 9:41 AM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. दोन सामने रंगले असून दोन्ही सामने भारताने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. आता भारतासाठी क्लीन स्वीप पूर्ण करत मालिका संपवण्याची संधी आहे. आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रंगणार आहे. चेन्नईमध्ये तिसरा सामना खेळवला जाईल. आता या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन खेळणार की नाही याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. कारण मागील सामन्यात या दोन्ही खेळाडूंना दुखापत झाली होती. आता हे दोन्ही खेळाडू खेळण्यासाठी फिट आहे कती नाही याबद्दलची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यापूर्वी, भारताचे सहाय्यक प्रशिक्षक, रायन टेन डोशेट यांनी शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या दुखापतींबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

भारताने ही मालिका आधीच 2-0अशा अभेद्य आघाडीसह जिंकली आहे. दुसऱ्या सामन्यात कर्णधार शुभमन गिल, ज्याला क्रॅम्प आले होतेतर  गिल व्यतिरिक्त, इशान किशनलाही लखनौमध्ये खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतरच्या तपासणीत दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आणि फलंदाजी केल्यानंतर इशान सावरला. त्यामुळे, त्याच्या तंदुरुस्तीबद्दल कोणतीही चिंता नाही.

डोशेट यांनी सांगितले की शुभमन तंदुरुस्त आहे. त्या दिवशीच्या उन्हामुळे त्याच्या पोटरीत फक्त थोडासा गोळा आला होता, पण तो पूर्णपणे ठीक आहे. ईशानचा खांदा ठीक आहे. फलंदाजी केल्यानंतर तो चांगला सावरला आहे. नितीश रेड्डीसुद्धा किरकोळ वेदनेमुळे मागचा सामना खेळू शकला नाही, पण तो तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. त्याची तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारताला त्याला 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याचा संभाव्य पर्याय म्हणून तयार करायचे आहे.

विशेष म्हणजे, रायन टेन डोशेट यांनी असे संकेत दिले आहेत की “डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग चेन्नईतील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यातून बाहेर असू शकतो. वर्कलोडमुळे अर्शदीपला विश्रांती दिली जाऊ शकते.” त्याने दोन सामन्यांमध्ये 14.40 च्या प्रभावी सरासरीने पाच विकेट घेतल्या आहेत.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी