AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथे मोठी दुर्घटना, समुद्रात पोहायला गेलेली पाच मुले बुडाली

रत्नागिरीचा समुद्र किनारा अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतो. मात्र हा समुद्र किनारा धोकादायक असून येथे पोहण्यास मनाई असतानाही अनेक पर्यटत समुद्रात उतरण्याचे धाडस करत असतात.

रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथे मोठी दुर्घटना, समुद्रात पोहायला गेलेली पाच मुले बुडाली
ganpati pule beach accident
| Updated on: Jun 20, 2026 | 3:58 PM
Share

महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांचा बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर लाईफगार्ड आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. या चार मुलांना समुद्राच्या लाटेने कवेत घेतल्याचे म्हटले जात आहे.

रत्नागिरीच्या गणपतीपुळे येथील पर्यटनस्थळी अनेक जण उन्हाळ्यात फिरायला जात असतात. या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या तरुणांनी समुद्रात पोहण्यासाठी उडी मारली. मात्र, या समुद्रातील लाटांचा अंदाज न आल्याने ही मुले बुडू लागली. समुद्रकिनाऱ्यावरील मुलांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक मच्छीमारांनी या वेळी मदतीसाठी समुद्रात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाल्याने या मुलांचा शोध सुरु आहे.

प्राथमिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरातील ११ जणांचा एक पर्यटक गट फिरायला रत्नागिरी गणपतीपुळे येथे आला होता. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक समुद्र किनारी पोहचले.त्यावेळी आठ तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. त्यातील तीन मुलांना स्थानिकांनी कसेतरी वाचवले मात्र,  पाच तरुणांना लाटेने आपल्या कवेत घेतल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते बुडाल्याचे म्हटले जात आहे.   किनाऱ्यावरील त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर या मुलांना वाचविण्यासाठी  लाईफ गार्ड आणि स्थानिक मच्छीमारांनी समुद्रात धाव घेतली. मच्छीमारांची टीम या मुलांचा शोध घेत आहे. परंतू वारा आणि समुद्रात तुफान वारे असल्याने मदतकार्यात अडथळे आणत आहे.

बेपत्ता मुलांची नावे काय ?

ज्या मुलांचा समुद्रात थांगपत्ता लागत नाहीए, त्यांची नावे आदित्य राऊत, यश कांबळे, अनिकेत हिवराळे, प्रेम अदमे आणि आनंद नवराडे अशी असल्याची माहिती मिळाली आहे. हे लोक संभाजीनगरातील रहीवासी असल्याचे म्हटले जात आहे. या पाच लोकांच्या शोधसाठी मदतकार्य सुरु असले तरी समुद्रात भरती तसेच पावसाच्या आगमनाआधी खवळलेला समुद्र असल्याने शोधकार्यात अनेक अडथळे येत आहेत. समुद्रात पर्यटकांनी उतरु नये असे फलक लावूनही पर्यटक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने असे अपघात घडत आहेत.

Follow Us
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा