AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 स्पर्धेत सर्वात वेगवान गोलची नोंद! आर्थिक अडचणीमुळे आई वडिलांनी सोडला होता देश

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येक सामन्यात काही ना काही नाविन्यपूर्ण घडत आहे. काही विक्रमांची ऐतिहासिक नोंद देखील होत आहे. असाच एक विक्रम फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या मोरक्को स्कॉटलँड सामन्यात नोंदवला गेला. या स्पर्धेत एकमेव गोल नोंदवला गेला आणि विजयासह त्याची ऐतिहासिक नोंद झाली.

FIFA World Cup 2026 स्पर्धेत सर्वात वेगवान गोलची नोंद! आर्थिक अडचणीमुळे आई वडिलांनी सोडला होता देश
FIFA World Cup 2026 स्पर्धेत सर्वात वेगवान गोलची नोंद! आर्थिक अडचणीमुळे आई वडिलांनी सोडला होता देशImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 20, 2026 | 3:54 PM
Share

Scotland Vs Morocco: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सी गटातील दुसऱ्या सामन्यात मोरक्को आणि आणि स्कॉटलँड हे आमनेसामने आले होते. या सामन्यात मोरक्कोने स्कॉटलँडला 1-0 ने मात दिली. या सामन्यात मोरक्कोच्या इस्माइल साइबारीने एक गोल मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. हा गोल फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सर्वात वेगवान गोल ठरला आहे. मोरक्कोचा मिडफिल्डरने स्कॉटलँडविरुद्ध अवघ्या 70 सेकंदात गोल मारला. त्यामुळे या गोलचा विक्रमी गोल म्हणून नोंद झाली आहे. या वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा गोल आहे. यापूर्वी त्याने ब्राझीलविरुद्ध पहिला गोल मारला होता. ब्राझीलविरुद्ध एक गोल मारून हा सामना 1-1 ने बरोबरीत सोडवला होता. आता इस्माईल साइबारीने फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वात वेगवान गोल मारला आहे. तसेच या गोलमुळे स्कॉटलँडचा पराभव ठरला.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत मोरक्को आणि स्कॉटलँड यांच्यातील सामना 90 मिनिटांपर्यंत चालला, पण या सामन्याचा निकाल 70व्या सेकंदाला झाला. फिफा वर्ल्डकप स्पर्धेत मोरक्कोकडून सर्वात वेगवान गोल मारला गेला आहे. स्कॉटलँडच्या गोलपोस्टमध्ये पुरूष फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यातील सर्वात वेगवान गोल ठरला आहे. म्हणजेच या स्पर्धेच्या इतिहासात स्कॉटलँडने सर्वात वेगवान गोल मारला आहे. इस्माईल सायबरी आता इजिप्तच्या मोहम्मद सालाहनंतर पहिल्या दोन विश्वचषकांमध्ये गोल करणारा दुसरा आफ्रिकन खेळाडू ठरला आहे.

आर्थिक स्थितीमुळे आईवडिलांनी देश सोडला होता

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत मोरोक्कोसाठी सलग दोन सामन्यात महत्त्वाची भूमिका बाजवणाऱ्या स्टार मिडफिल्डर इस्माईल सायबरीचा प्रवास तीन देशातून झाला आहे. त्याचा जन्म 2001 मध्ये स्पेनमध्ये झाला होता. मात्र त्याचे आई वडील मूळचे उत्तर मोरक्कोचे होते. कामासाठी त्यांनी देश सोडला आणि स्पेनमध्ये स्थायिक झाले होते. त्याचे आई वडील स्पेनमध्ये 18 वर्षे राहिले. सर्वकाही सुरळीत सुरू होतं. इस्माईलने स्पेनमध्ये फुटबॉलचे धडे गिरवले. पण 2008 मध्ये कुटुंबावर आर्थिक आघात झाला. आर्थिक मंदीमुळे जगणं कठीण झालं. त्यामुळे त्यांनी स्पेन सोडून बेल्जियमला जाण्याचा निर्णय घेताल. त्यानंतर इस्माईलच्या फुटबॉल कारकि‍र्दीला आकार मिळाला. इस्माईल नंतर बेल्जियममधून नेदरलँडला गेले. तीन देश, तीन भाषा आणि तीन फुटबॉल संस्कृती जाणत असल्याने इस्माईल घातक मिडफिल्डर ठरत आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी