AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राचा मोठा निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह आणि पोटदुखीच्या औषधांचाही समावेश

16 Medicines Banned : रुग्णांच्या सुरक्षिततेचा विचार करून केंद्र सरकारने 16 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तात्काळ बंदी घातली आहे. या यादीत मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश आहे.

केंद्राचा मोठा निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह आणि पोटदुखीच्या औषधांचाही समावेश
16 Medicines BannedImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 20, 2026 | 3:50 PM
Share

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, रुग्णांच्या सुरक्षिततेचा विचार करत 16 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तात्काळ बंदी घातली आहे. या औषधांमध्ये अँटिबायोटिक्स, पोटदुखीवरील औषधे, मधुमेहावरील औषधे तसेच काही त्वचा आणि कॉस्मेटिक उत्पादनांचा समावेश आहे. हा निर्णय औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 26A अंतर्गत घेण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केंद्र सरकारने तातडीने 16 औषधांवर बंदी घातली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध तांत्रिक सल्लागार मंडळाची तज्ज्ञ समिती आणि त्याच्या उपसमितीच्या परीक्षणात या औषधांच्या संयोजनांना कोणताही ठोस वैद्यकीय आधार नसल्याचे आढळून आले. तसेच ही औषधे किती प्रभावी आहेत याचे पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून सरकारने ही बंदी घातली आहे.

2021 पासून सुरू होती तपासणी

बंदी घालण्यात आलेल्या या औषधांची तपासणी प्रक्रिया 2021 मध्ये सुरू झाली होती. या काळात उपलब्ध वैज्ञानिक संशोधन आणि वैद्यकीय माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले. औषध उत्पादक कंपन्या आणि संबंधित पक्षांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, तज्ज्ञ समिती त्यांच्या स्पष्टीकरणांवर समाधानी नव्हती. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये उपसमितीने सर्व 16 औषध संयोजनांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती.

अँटिबायोटिक औषधांवर प्रश्नचिन्ह

बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये अमोक्सिसिलिन + सेराटिओपेप्टिडेस, अमोक्सिसिलिन + सेराटिओपेप्टिडेस + लॅक्टोबॅसिलस स्पोरोजीन्स, सेफ्युरोक्झाइम + सेराटिओपेप्टिडेस आणि सेफाड्रॉक्सिल + प्रोबेनेसिड यांसारख्या अँटिबायोटिक संयोजनांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, या घटकांना एकत्र देण्याचा कोणताही स्पष्ट वैद्यकीय फायदा सिद्ध झालेला नाही.

पोटदुखी आणि मधुमेहावरील औषधांचाही समावेश

सरकारने डायसायक्लोमाइन + पॅरासिटामोल + क्लिडिनियम ब्रोमाइड या पोटदुखीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधावरही बंदी घातली आहे. याशिवाय ग्लिकलाझाइड + क्रोमियम पिकोलिनेट या मधुमेहावरील औषध संयोजनालाही बंदी घालण्यात आली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मधुमेहाच्या उपचारासाठी क्रोमियम पिकोलिनेट वापरण्याची शिफारस कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आलेली नाही, त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे.

रुग्णांच्या सुरक्षिततेवर सरकारचा भर

सरकारने स्पष्ट केले आहे की औषधांचा वापर वैज्ञानिक पुरावे आणि वैद्यकीय गरजांच्या आधारावर केला गेला पाहिजे. रुग्णांना अतिरिक्त फायदा न देणारी आणि संभाव्य आरोग्यधोके वाढवण्याची शक्यता असणारी औषध संयोजने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणे योग्य नाही. त्यामुळे हा निर्णय औषधांच्या सुरक्षित वापराच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.

Follow Us
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष