मला बेशुद्ध करून…अभिनेत्रीने सांगितली खळबळजनक घटना, म्हणाली, मी ऑडिशनला गेले तो एकटाच, त्याने मला…

नुकताच एका अभिनेत्रीने धक्कादायक घटना सांगितली आहे. कशाप्रकारे आपण ऑडिशनला गेलो होतो आणि आपल्याला बेशुद्ध करण्यात आले हे तिने सांगितले. पण तिने पुढे म्हटले की, प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट असे दोन्ही लोक असतात.

मला बेशुद्ध करून...अभिनेत्रीने सांगितली खळबळजनक घटना, म्हणाली, मी ऑडिशनला गेले तो एकटाच, त्याने मला...
Rashmi Desai
| Updated on: Aug 04, 2025 | 3:55 PM

अभिनेत्री रश्मी देसाई हिने मोठा काळ मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये गाजवलाय. रश्मी देसाईने एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला. कास्टिंग काऊचबद्दल बोलताना ती दिसली. रश्मी देसाई ऑडिशनला गेली होती आणि त्यावेळी तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत बोलताना रश्मी म्हणाली की, दुर्देवी घटना आहे पण…मी देखील  कास्टिंग काऊचची शिकार झालीये. मला आठवते की, मला ऑडिशनसाठी बोलवण्यात आले होते.

मला तिथे ऑडिशनला बोलावले आणि मी तिथे जाताच…

पुढे बोलताना रश्मी म्हणाली, ज्यावेळी मी ऑडिशन देण्यासाठी तिथे गेले त्यावेळी त्या व्यक्तीशिवाय दुसरे तिथे कोणीच नव्हते. मी त्यावेळी फक्त 16 वर्षांची होते आणि मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला काहीच कळच नव्हते मी काहीही करून तिथून पळून आले. मी घटनेच्या काही तासांनी याची माहिती माझ्या आईला दिली. माझ्यासोबत नेमकं काय झाले हे मी तिला सांगितलं.

अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा 

घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीला भेटण्यासाठी रश्मी देसाई पोहोचली. यावेळी तिची आई देखील सोबत होती. रश्मीच्या आईने त्या व्यक्तीच्या कानाखाली लावली. पुढे रश्मी म्हणाली की, मुळात म्हणजे कास्टिंग काऊच सारखी गोष्ट वास्तव्यास आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट अशी दोन्हीप्रकारची लोक असतात. मी खरोखरच स्वत:ला खूप जास्त भाग्यशाली समजते की, त्यानंतर मला चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीला भेटण्यासाठी पोहोचली अभिनेत्री

मी ज्यांच्यासोबत काम केले, त्यांच्यासोबत मला चांगला अनुभव आल्याचे तिने म्हटले. रश्मी देसाई कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही रश्मी चांगलीच सक्रिय आहे. रश्मी देसाई हिने टीव्ही मालिकांमध्येही मोठा काळ गाजवला आहे. अनेकदा ती मुलाखतींमध्ये आपल्या आयुष्याबद्दल सांगताना दिसते. रश्मी देसाई हिने काही गुजराती चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बॉसच्या घरातही रश्मी पोहोचली होती.