
रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda ) हे दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार आहेत. रश्मिकाचाी बॉलिवूडमध्येही एंट्री झाली असून, अनेक चित्रपटांत ती झळकली, तिच्या कामाचं खूप कौतुकही झालं. तिच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच रश्मिकाच्या पर्शनला आयुष्याबद्दलही चर्चा होत असते. विजय देवरकोंडा आणि तिच्या नात्याबद्दलही लोकं बोलत असतात. त्या दोघांचा नुकताच साखरपुडा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, त्यानंतर विजय देवेरकोंडाच्या टीमने रश्मिका मंदान्नासोबत अभिनेत्याच्या एंगेजमेंटची पुष्टी केली होती. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ मध्ये झळकलेल्या या जोडप्याची ऑक्टोबर 2025मध्येच एगेंजमेंट झाली आणि आता ते फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न करण्याची योजना आखत आहेत.
पण रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या कुटुंबियांकडून अधिकृत निवेदन अद्याप आलेले नसले तरी , राजस्थानमध्ये ते दोघे डेस्टिनेशन वेडिंग करू शकतात अशी चर्चा आहे. या सर्व अफवा सुरू असतानाच, रश्मिकाने अलीकडेच एका इंटरव्ह्यूमध्ये लग्नाच्या बातम्या, विजयशी नातं यावर स्पष्टपणे भाष्य केलं. काय म्हणाली रश्मिका ?
विजयशी फेब्रुवारीत बांधणार लग्नगाठ ?
पुढील वर्षी,म्हणजेच 2026 च्या फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमध्ये विजय देवरकोंडाशी लग्न करणार असल्याच्या वृत्ताबद्दल तिला विचारण्यात आलं. “मला लग्नाची पुष्टी करायची नाहीये किंवा नकारही द्यायचा नाहीये. मी फक्त एवढंच म्हणेन की जेव्हा आम्हाला त्याबद्दल बोलण्याची गरज वाटेल, तेव्हा आम्ही बोलू” असं सांगत तिने या विषयावर आणखी भाष्य करणं टाळलं.
प्रत्येकाच्या जीवनात असावा विजय देवरकोंडा
‘द गर्लफ्रेंड’ या रश्मिकाच्या चित्रपटाचे खूप कौतुक झालं. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत विजयच्या सपोर्टमुळे रश्मिका खूप भावूक झाली होती. “विजू, तू सुरुवातीपासूनच या चित्रपटाचा भाग आहेस… आणि तू चित्रपटाच्या यशाचा एक भाग आहेस… या संपूर्ण प्रवासात तू पर्सनली होतास. मी फक्त एवढीच आशा करते की प्रत्येकाच्या आयुष्यात विजय देवरकोंडा असावा, कारण तो एक आशीर्वाद आहे.” अशा शब्दांत रश्मिकाने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
हो, मी विजयशी लग्न करेन..
तू तुझ्या कोणत्या सहकलाकाराशी लग्न करशील, असा सवाल काही दिवसांपूर्वी रश्मिकाला विचारण्यात आला होता. तेव्हा तिने जराही न लाजता, स्पष्ट उत्तर दिलं होतं की, “हो, मी विजयशी लग्न करेन.” तिचा रिप्लाय ऐकून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाच्या बातम्यांबाबत बरीच चर्चा सुरू झाली होती.
गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड, या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर रश्मिका आणि विजय या जोडप्याचे नाते अधिक घट्ट झाले. गेल्या काही वर्षांत ते अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दलच्या अटकळींना उधाण आलं होतं. मात्र त्यांनी आपलं पर्सनल आयुष्य प्रायव्हेट ठेवत या नात्याबद्दल मौन राखलं होतं. मात्र आता रश्मिकाच्या या उत्तरामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना आणखीनच बळ मिळालं आहे. फेब्रुवारीत त्याचं लग्न कधी होत, त्याचे फोटो पाहण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.