AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: मृत्यू कसा होणार हे नानांनी आधीच सांगितलं होतं? प्रसिद्ध अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; वाचून सर्वच सुन्न

Nana Patekar: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. नानांनी आधीच त्यांच्या मृत्यूविषयी वक्तव्य केले होते.

Nana Patekar: मृत्यू कसा होणार हे नानांनी आधीच सांगितलं होतं? प्रसिद्ध अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; वाचून सर्वच सुन्न
Nana patekar Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 1:26 PM
Share

नाना पाटेकर यांच्या जवळच्या व्यक्ती त्यांच्या निधनाच्या बातमीने पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री साई देवधरलाही नाना पाटेकर यांच्या जाण्याचा मोठा धक्का बसला आहे. साई यांनी सांगितले की, नाना पाटेकर हे मानलेले मामा होते. अभिनेत्रीने नाना यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की एकदा मृत्यू कसा होणार हे नानांनी आधीच सांगितलं होतं?

एका मुलाखतीत साई म्हणाली की, मला अजूनही विश्वास बसत नाही. माझ्या आईची नाना काकांशी चार दिवसांपूर्वीच चर्चा झाली होती. आमचे कुटुंब त्यांच्या खूप जवळचे होते. मी माझ्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी त्यांना फोन करणार होते. मी आजच त्यांना बोलावणे होते. ते माझे मामा होते. माझे मानलेले मामा होते. माझे आई-वडील ते स्टार बनण्यापूर्वीपासूनचे मित्र होते. ते रात्री येत आणि आम्हाला जेवायला किंवा आयस्क्रीम खायला बाहेर घेऊन जात असत.

साई यांनी नाना यांच्याबाबत मजेशीर किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, एकेकाळी नाना काकांना वाटायचे की माझ्या वडिलांकडे पैसे आहेत, तर माझे वडीलही असंच समजत होते की नाना काकांकडे पैसे आहेत. शेवटी जेव्हा आम्ही आयस्क्रीम खायला गेलो, तेव्हा आमच्यापैकी कोणाकडेही पैसे नव्हते. माझे आई-वडील त्यांच्या ‘प्रहार’ चित्रपटात होते. मीही त्यात काम केले होते आणि डिंपलची मुलगी बनले होते. चित्रपटाच्या दरम्यान नाना रोज माझ्या आई-वडिलांसोबत वेळ घालवत असत. ते त्यांचे सर्वात जवळचे मित्र होते. त्यांच्यासाठी आमचे घर हे त्यांचे स्वतःचे घर होते. मी त्यांचे एक उत्कृष्ट रूप पाहिले आहे. माझे वडील नाना काकांचे जणू राइट हँड होते.

साई यांच्या आईला दिले पैसे

साई यांनी सांगितले की, नाना पाटेकर त्यांच्या आईला आर्थिक मदतही करत असत. त्या सांगतात, ते मुलांसारखे होते. कधीकधी मुलासारखे अचानक रागावत असत. ते खूप खरे माणूस होते. माझे आई-वडील एका चाळीत राहत होते. नाना काका आपल्या कमाईच्या १० टक्के माझ्या आईच्या खात्यात पाठवत असत, कारण ते त्यांना आपली बहीण मानत असत. या सगळ्या गोष्टींची किंमत लावता येत नाही. मल्हार आणि मी एकत्र मोठे झालो.

मृत्यूबाबत केला होता खुलासा

अभिनेत्री म्हणाली की, नाना पाटेकर म्हणत असत की, ते कोणाला त्रास देऊन जाऊ इच्छित नाहीत. ते नेहमी म्हणत की, मी जाईन तर असाच पटकन जाईन. देवाने त्यांची इज्जत राखली. नाना यांचे हसणे खूप आठवेल.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ