शिल्पा शिरोडकरच्या हत्येचा झाला होता प्रयत्न? काय आहे सत्य जाणून घ्या

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने नुकताच एका घटनेचा उल्लेख केला ज्याने कुटुंबात खळबळ माजवली होती. 1995 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरली होती. अभिनेत्रीने या प्रकरणामागची संपूर्ण कहाणी स्वतः सांगितली आहे.

शिल्पा शिरोडकरच्या हत्येचा झाला होता प्रयत्न? काय आहे सत्य जाणून घ्या
Shilpa Shirodkar
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 21, 2025 | 7:07 PM

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती नुकताच सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती. लवकरच ती ‘जटाधारा’ या चित्रपटात दिसणार आहेत. यापूर्वी एका मुलाखतीमध्ये तिने एका घटनेचा उल्लेख केला होता. ते ऐकून तिच्या कुटुंबात खळबळ माजवली होती. अनेक वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या मृत्यूची अफवा पसरली होती, जी नंतर निर्मात्यांनी केलेला प्रमोशनल स्टंट असल्याचे समजले.

शिल्पा शिरोडकरने सांगितलेली ही घटना ‘रघुवीर’ या चित्रपटाशी संबंधित आहे. 30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटादरम्यान निर्मात्यांनी असे काही केले की शिल्पा खूप संतापली होती. मात्र, चित्रपटाच्या यशामुळे तिने जास्त नाराजी व्यक्त केली नाही.

वाचा: घराच्या पूर्व दिशेत लपले आहे श्रीमंतीचे रहस्य, ‘या’ ठिकाणी ठेवा 5 वस्तू!

‘शिल्पा शिरोडकरची गोळी मारून हत्या…’

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या मृत्यूची अफवा पसरली होती. तिची हत्या करण्यात आली. ती म्हणाली, “जेव्हा मी सुनील शेट्टीसोबत मनालीत शूटिंग करत होते, तेव्हा माझे वडील हॉटेलात फोन करत होते, कारण त्या काळात आमच्याकडे मोबाइल फोन नव्हते.” ती पुढे म्हणाली, “वृत्तपत्रात हेडलाइन छापली होती की शिल्पा शिरोडकरची गोळी मारून हत्या झाली आहे.” ही बातमी शूटिंग पाहणाऱ्या सर्वांनाच माहीत होती.

20-25 मिस्ड कॉल्स आले होते

शिल्पाने पुढे सांगितले की, जेव्हा ती आपल्या खोलीत गेली तेव्हा तिला 20-25 मिस्ड कॉल्स दिसले. तिच्या पालकांना या बातमीमुळे खूप चिंता वाटू लागली होती. नंतर निर्मात्यांनी तिला सांगितले की हा एक प्रमोशनल स्टंट होता. त्यानंतर शिल्पाने सुटकेचा निःश्वास सोडला आणि ठीक आहे असे म्हटले. पण ती म्हणाली की हा पब्लिसिटी स्टंट जरा जास्तच होता.

‘जटाधारा’मध्ये दिसणार शिल्पा

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 51 वर्षीय शिल्पा लवकरच ‘जटाधारा’ या चित्रपटात दिसणार आहे. यामुळे ती बऱ्याच कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर परतणार आहे. अहवालानुसार, हा चित्रपट यंदा नवरात्रीच्या निमित्ताने रिलीज होऊ शकतो.