AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका–इराण संघर्ष पुन्हा पेटणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या गूढ उत्तरामुळे उंचावल्या भुवया !

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अजूनही अनिश्चित आहे, चर्चेने वेगळे वळण घेतले आहे. इराणच्या नवीन प्रस्तावावर ट्रम्प समाधानी नाहीत आणि त्यांनी हल्ल्याच्या प्रश्नाला टाळले आहे. अमेरिकेसमोर आता थेट कारवाई किंवा वाटाघाटी असे दोनच पर्याय आहेत, ज्यात ट्रम्प थेट कारवाई टाळू इच्छितात. मध्य पूर्वेत तणाव वाढत असून, विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती चिघळली आहे.

अमेरिका–इराण संघर्ष पुन्हा पेटणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या गूढ उत्तरामुळे उंचावल्या भुवया !
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: May 02, 2026 | 7:58 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष सध्या जरी थांबला असला तरीही दोन्ही देशांमधील चर्चा योग्य मार्गाने होण्याऐवजी, त्याने वेगळच वळण पकडलं आहे. इराणने चर्चेसाठी नवीन प्रस्ताव पाठवल्यानंतर काही तासांतच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यासंदर्भात विचारण्यात आलेला थेट प्रश्न टाळला. वॉशिंग्टनमधील पत्रकारांनी ट्रम्प यांना अमेरिका इराणवर पुन्हा हल्ला करेल का, असे विचारले असता, ट्रम्प यांनी यावर थेट उत्तर देण्यास नकार दिला. मी तुम्हाला का सांगू ? असं म्हणत ट्रम्प यांनी तो मुद्दा तिथेच संपवला.

इराणने दिलेल्या वाटाघाटींच्या नवीन प्रस्तावावर आपण समाधानी नसल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्टपणे सांगितलं होतं. इराणच्या नेतृत्वातील मतभेदांमुळे चर्चा पुढे सरकत नसल्याचंही ट्रम्प म्हणाले होते. वाटाघाटी सुरू होत्या, पण त्या सुसंगत नव्हत्या. कधीकधी गोष्टी पुढे सरकत होत्या, पण मध्येच कधी नवीन लोक येऊन परिस्थिती बदलायची, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

पुढले पर्याय काय ?

‘आता अमेरिकेकडे फक्त दोनच पर्याय आहते. पहिला म्हणजे संपूर्ण ताकद लावून थेट कारवाई करावी किंवा दुसरा पर्याय म्हणजे तडजोडीसाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणे.  मात्र, पहिला पर्याय स्वीकारणं मी पसंत करणार नाही, म्हणजेचे ते थेट, मोठी कारवाई टाळतील. इराण अशा मागण्या करत आहे ज्या त्यांना मान्य नाहीत’, असंही पुढे ट्रम्प म्हणाले. मात्र (इराणच्या) त्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत हे काही ट्र्म्प यांनी स्पष्ट केलेलं नाही.

मध्य पूर्वेतील वाढता तणाव

दरम्यान, जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने आपली पकड कायम ठेवली आहे. पण त्याचवेळी, अमेरिकेने इराणी बंदरांवर नाकेबंदी लादल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात, संघर्षात आत्तापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इराणमध्ये 3,375 हून अधिक आणि लेबनॉनमध्ये 2,600 हून अधिक लोक मारले गेले आहेत. याव्यतिरिक्त, इस्रायलमध्ये 24 आणि आखाती देशांमध्ये 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमध्ये सतरा इस्रायली सैनिक आणि संपूर्ण प्रदेशात 13 अमेरिकन सैनिकही मारले गेले आहेत.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर
सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत? स्वत: फोनवर दिलेल्या उत्तराने खळबळ
घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर अंधारेंचा संताप
Sushma Andhare | घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचा संताप, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून...
Video | संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून... दिल्लीत मोठं घडणार?
ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश
Omraje Nimbalkar | ओमराजे गद्दारी करू नका!; सोशल मीडियावर समर्थकांचा भावनिक आक्रोश, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण
शिंदे गटाकडे फक्त पैसा, विचार नाही!; ऑपरेशन टायगरवरून दानवेंचा घणाघात
Ambadas Danve । शिंदे गटाकडे फक्त पैसा, विचार नाही!; ऑपरेशन टायगरवरून अंबादास दानवेंचा घणाघात
मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क... ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा
मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क... ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा मंत्री?
गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत राऊतांचा इशारा
Sanjay Raut UNUCT | गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत संजय राऊतांचा थेट इशारा
त्या प्रकरणासाठी ओमराजे निंबाळकरांवर दबाव, संजय राऊतांनी सांगूनच टाकलं
Omraje Nimbalkar | त्या प्रकरणासाठी ओमराजे निंबाळकरांवर दबाव, संजय राऊतांनी सांगूनच टाकलं
15- 15 कोटी मिळेपर्यंत ते चार्टेड विमानतही चढले नव्हते अन्... संजय
15-15 कोटी मिळेपर्यंत ते चार्टेड विमानतही चढले नव्हते अन्... संजय राऊतांनांचा मोठा दावा, थेट...
50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा
Sanjay Raut । 50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा गौप्यस्फोट