Maharashtra Board HSC Result 2026 Declared LIVE at TV9 Marathi : हिप हिप हुर्रे… जल्लोष… धुमाकूळ आणि पेढे वाटप… निकाल पाहताच बारावीच्या विद्यार्थ्यांचा आनंद शिगेला
Maharashtra Board 12th Result 2026 LIVE Updates in Marathi : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. कोकण विभाग निकालात अव्वल ठरला आहे.

बारावी अर्थात HSC परीक्षेचा निकाल आज 2 मे रोजी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा राज्यभरात घेण्यात आल्या. त्या परीक्षेचा निकाल आज लागला. विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार आहे. दुपारी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये विभागनिहाय निकाल जाहीर झाला. संपूर्ण निकालाची टक्केवारी सांगण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने बघता येईल. विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन तसेच इतर माध्यमांद्वारे सहज पाहू शकतात. www.tv9marathi.com वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. यासोबतच mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर जाऊन आपला रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतात. बारावी निकालाचे प्रत्येक अपडेट आपल्याला येथे tv9 च्या लाईव्ह ब्लॉगवरही बघायला मिळेल. निकालाचे प्रत्येक अपडेट आपल्याला इथे बघायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
सांगली – पोहायला गेलेल्या मुलांपैकी आठ मुले बुडाली, एका मुलीचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली आठ मुले नदीमध्ये बुडाली. त्यातील सात मुलांना वाचविण्यात यश आले असून मात्र एका वीस वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. फिरदोस जाकीर शिकलगार असे या मुलीचे नाव असून तिचे मूळ गाव कोरेगाव आहे तर ती मुंबई येथे राहावयास होती.
-
भोंदु मनोहर भोसलेसह त्यांच्या दोन साथीदारांना न्यायालयाचा दिलासा
भोंदु मनोहर भोसलेसह त्यांच्या दोन साथीदारांना माढा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. माढा न्यायालयाने भोसले आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
-
-
दहिसर-भाईंदर लिंक रोडवर मोठी दुर्घटना, क्रेन कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
दहिसर-भाईंदर लिंक रोडवर मोठी दुर्घटना, क्रेन कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामादरम्यान एल अँड टी कंपनीची क्रेन कोसळून मोठी दुर्घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू
रघुनाथ दास आणि काना सिंग अशी मृत कामगारांची नावे असून, या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू
-
मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयाकडून दिलासा
भोंदू बाबा मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माढा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कुर्डूवाडी पोलिसांनी मागितलेली पोलीस कोठडी माढा न्यायालय नाकारत मनोहर भोसले आणि त्यांच्या दोन साथीदारांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
-
जळगाव शहरातल्या एमआयडीसी परिसरातील चटई कंपनीला भीषण आग
जळगाव शहरातल्या एमआयडीसी परिसरातील चटई कंपनीला भीषण आग
शेजारच्या इतरही चार ते पाच कंपन्यांना भीषण आग
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
आगीत कंपनीतील तीन ते चार सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती
-
-
कॉपीमुक्त अभियानामुळे बीड जिल्ह्यात बारावीच्या निकालात 5 टक्क्यांची घट
बीडच्या ग्रामीण केंद्रांवर CCTV आणि झूमद्वारे पाळत ठेवल्याने यंदा 88.90 टक्के निकाल लागला आहे. परीक्षेदरम्यान कॉफीसाठी मदत करणाऱ्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या 19 शिक्षकांचे निलंबन करण्यात आले होते. तर गैरप्रकार करणाऱ्या 342 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान कॉपीमुक्त अभियानामवळे यंदा जिल्ह्याच्या निकालात पाच टक्क्यांची घट झाली आहे.
-
बोरामणी गावातील ट्रिपल मर्डरने सोलापूर हादरलं
बोरामणी गावात आई आणि दोन मुलांची तलवारीने हल्ला करून जखमी केल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून तिघा जणांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गायत्री सुधाकर मस्के, बारावीत शिकणारी प्रिया मस्के आणि दहावीत शिकणारा शिवराय मस्के असे हत्या झालेल्या तिघांची नावे आहेत. तर पपू मस्के असे संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
बुलढाणा : मंगरूळ गावात पाणी टंचाई, ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा
चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे भीषण पाणी टंचाईने नागरिकांचा संयम सुटला असून, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले. पाणी आमचा हक्क आहे, गावाला पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. गेल्या अनेक दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता भासत असून, विशेषतः महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
-
पुणे : तीन वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार हत्या
पुणे जिल्ह्यातील चाकणच्या म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खालुंब्रे येथे तीन वर्षाच्या अल्पवयीन चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची धारदार सुरीने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. मूळचा बिहार राज्यातील असलेल्या एका सोळा वर्षे अल्पवयीन तरुणानी हे कृत्य केलं असल्याने दक्षिण महाळुंगे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
-
गोंदियात पुन्हा उन्हाचा तडाखा, तापमान 40 अंशांवर
गोंदिया जिल्ह्यात काल ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून नागरिक हैराण झाले आहेत.
-
जबलपूरमधील क्रूझ दुर्घटनेचा आणखी व्हिडीओ समोर
जबलपूरमधील क्रूझ दुर्घटनेचा आणखी व्हिडीओ समोर. क्रूझ नदीत बुडण्याच्या 15 मिनिटे आधीचा व्हिडीओ समोर. दुर्घटनेआधी क्रूझमधील पाणी वाढत असताना पर्यटकांध्ये भीती, पर्यटकांनी भरलेली क्रूझ नर्मदा नदीवरील बर्गी धरणात बुडाली. आतापर्यंत 9 मृतदेह हाती लागले आहेत, तर काही पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत.
-
अमरावतीच्या परतवाडामध्ये मुलींचं लैगिक शोषण प्रकरण
अमरावतीच्या परतवाडामध्ये मुलींचं लैगिक शोषण प्रकरण. मुख्य आरोपी उजेरखान, इकबाल खानची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपींना आज पुन्हा अचलपूर न्यायालयात हजर केले जाणार. आरोपी उजेरखान विरोधात 16 वर्षीय पीडितेच्या आईची तक्रार. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी
-
नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द
NEET UG 2026 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. ३ एप्रिल रोजी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. तथापि, विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वे मुंबई विभागात २ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान मेन लाईनवर तसेच ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक जाणून घ्या.
-
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूनंतर मुंबईतील भेंडी बाजारातून कलिंगड बेपत्ता
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूनंतर मुंबईतील भेंडी बाजारातून कलिंगड बेपत्ता…भेंडी बाजारात कोणत्याही फळांच्या दुकानात कलिंगड उपलब्ध नाही…
-
चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचारा आरोपी कोर्टात हजर
चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचारा आरोपीला पुणे ग्रामीण पोलीस दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करणार आहेत. या घटनेचं गांभीर्य पुणे ग्रामीण पोलिसांकडून कोर्टाला सांगून आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न.
-
काम सुरू असल्यामुळे नाला ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास
गडचिरोली जिल्ह्यातील गुंडेनूर नाला ओलांडताना काम सुरू असल्यामुळे जीव मुठीत धरून कच्च्या मार्गावरून प्रवास करावा लागतो. मागील चार वर्षापासून भामरागड_आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्गाच्या काम सुरू आहे. गुंडेनूर नाल्यावर नेहमीच पावसाळ्यात वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे
-
हरिनाम सप्ताहाच्या सांगतेसाठी मनोज जरांगे पाटील उपस्थित
बीड येथील नेकनूर येथील बंकटस्वामी संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेसाठी मनोज जरांगे पाटील उपस्थित. मनोज जरांगे पाटलांसह आमदार संदिप क्षीरसागर, धनंजय देशमुख यांचीही उपस्थिती.
-
पुणे- मुंबई महामार्गावर कामशेतजवळ मोठा अपघात
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर कामशेतजवळ मोठा अपघात झाला आहे. दुपारी साधारण पावणे दोनच्या सुमारास एका डंपरचा अपघात होऊन तो थेट रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातामुळे रस्त्यावरून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबलचक रांग लागली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे.
-
राज्यात बारावीच्या निकालाचा मोठा उत्साह..
राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला. या निकालाचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे. मुलींनी या निकालात मोठी बाजी मारली. मुलांपेक्षा मुलींची पास होण्याची टक्केवारी अधिक आहे.
-
Maharashtra Board HSC Result 2026 Declared LIVE : बारावीचा निकाल जाहीर, मुलींच ठरल्या वरचढ..
बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात मुलीच वरचढ ठरल्या आहेत. पास होण्यामध्ये मुलींचा टक्का मुलांच्या टक्क्यापेक्षा अधिक आहे.
-
14 लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली..
बारावीचा निकाल जाहीर झाला. अखेर 14 लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. बोर्डाकडून अगोदर विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येत आहेत.
-
टीव्ही9 मराठी वेबसाईटच्या होमपेला जाऊन पाहा बारावीचा निकाल..
बारावी परीक्षेचा निकाल तुम्ही टीव्ही९ मराठीच्या वेबसाईटला भेट देऊन पाहू शकता…
-
Maharashtra Board HSC Result 2026 Declared : लातूर विभाग खाली एक नंबरला..
बारावीच्या यंदाच्या निकालात लातूर विभागाला मोठा दणका बसला आहे. लातूर विभाग नऊ विभागांमधून खालून एक नंबरला आल्याचे बघायला मिळत आहे.
-
Maharashtra Board HSC Result 2026 Declared LIVE : मुलींनी मारली थेट बाजी.. बारावीत मुलींचा टक्का अधिक..
बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या निकालात मुलींनी मोठी बाजी मारली आहे. मुलींनी मुलांना निकालात थोबीपछाड केल्याचे बघायला मिळत आहे.
-
www.tv9marathi.com वेबसाईटवर पाहा झटपट बारावीचा निकाल..
बारावीचा निकाल जाहीर झाला. यंदा निकालाची टक्केवारी घसरलीये. मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवर तुम्ही निकाल पाहात असाल तर www.tv9marathi.com वर जा होमपेजला जा तिथे तुम्हाला बारावीचा निकाल असे लिहिलेले दिसेल. तिथे क्लिक करा. लगेचच तुमच्या स्क्रीनवर निकाल पुढे येईल.
-
राज्याचा निकाल 89.79 टक्के.. बारावीच्या निकालाचा टक्का घसरला..
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, यंदाही बारावीच्या निकालाचा टक्का घसरल्याचे बघायला मिळत आहे. यंदा 89.79 टक्के निकाल हा लागला आहे.
-
नऊ विभागीय मंडळांचा बारावीचा निकाल पाहा..
नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा निकाल जाहीर. या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग आहे. लातूल विभागाला मोठा दणका बसलाय. लातूर विभागाचा सर्वात कमी निकाला लागला.
कोकण 94.14
पुणे 91.25
अमरावती 90.92
नाशिक 90.72
मुंबई 90.08
कोल्हापूर 89. 97
छत्रपती संभाजीनगर 88.68
नागपूर 88.67
लातूर 84.14
-
Maharashtra Board HSC Result 2026 Declared LIVE : बारावीच्या निकालात लातूर पॅटर्नला मोठा दणका…
बारावी निकाल असो किंवा दहावी निकाल कायम लातूर पटर्न चर्चेत असतो. मात्र, यंदाच्या निकालात लातूर पॅटर्न पूर्णपणे फेल गेल्याचे बघायला मिळत आहे. सर्वात कमी निकाल लातूर पॅटर्नचा लागला आहे.
-
Maharashtra Board HSC Result 2026 Declared LIVE at TV9 Marathi : tv9 मराठीच्या होमपेजला पाहा तुमचा बारावीचा निकाल..
टीव्ही9 मराठीच्या होम पेजला जा तिथे तुम्हाला बारावी निकाल दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर टाका आणि माहिती भरा. एक सेकंदात तुमचा निकाल स्क्रीनवर असेल.
-
Maharashtra Board HSC Result Live : मोठी बातमी बारावीचा निकालाचा टक्का पुन्हा घसरला..
बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्येच पुन्हा एकदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरल्याचे बघायला मिळत आहे.
-
Maharashtra Board HSC Result : लातूर विभागाला मोठा झटका
बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात लातूर विभागाला मोठा झटका बसला. लातूर पॅटर्न फेल गेल्याचे बघायला मिळत आहे. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.
-
Maharashtra Board HSC Result : बारावीचा निकाल जाहीर
बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली. मुलींचा पास होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे.
-
Maharashtra Board HSC Result : बारावीचा निकाल थोड्याचवेळात जाहीर..
बारावीचा निकाल वाचणे सुरू आहे. काही वेळातच निकाल जाहीर होईल. 153 विषयांची परीक्षा झाली. यंदा राज्याच्या बारावीचा टक्का चांगला आहे.
-
Maharashtra Board HSC Result 2026 LIVE : बोर्डाकडून निकालाचे वाचन सुरू..
बारावी निकाल बोर्डाकडून जाहीर केला जात आहे. काही वेळातच राज्याचा निकाल जाहीर होईल. नक्की कोणत्या विभागाने या निकालात बाजी मारली स्पष्ट होईल.
-
Maharashtra Board HSC Result 2026 LIVE : बारावीचा निकाल मोबाईलवर कसा बघणार? जाणून घ्या..
बारावीचा निकाल आज लागणार आहे. काही वेळातच या निकालाची घोषणा होईल. विशेष म्हणजे तुम्ही अगदी घरी बसल्याही मोबाईलवर निकाल पाहू शकता. एका क्लिकवर हा निकाल दिसेल. टीव्ही९ मराठीच्या होम पेजवर जा. तिथे बारावी निकालावर क्लिक करा. तिथे रोल नंबर आणि इतर माहिती टाका, तुम्हाला तुमचा निकाल लगेचच मिळेल.
-
Maharashtra Board HSC Result : मुलांपेक्षा मुलीच ठरणार वरचढ? काही मिनिटांमध्ये बारावीचा निकाल जाहीर…
बोर्डाकडून काही मिनिटांमध्येच बारावीच्या निकालाची घोषणा होईल. विभागीय निकाल बोर्डाकडून जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात आपला निकाल दुपारी 1 वाजता मिळेल. या निकालात नक्की कोण बाजी मारणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.
-
Maharashtra Board HSC Result 2026 : tv9 मराठीवर पाहा अगदी झटपट निकाल, ही स्टेप करा फॉलो…
बारावी निकाल लागण्याकरिता काही वेळ शिल्लक आहे. बोर्डाकडून अकरा वाजता निकालाची घोषणा केली जाईल. कोणत्या विभागाने बाजी मारली हे अगदी स्पष्ट होईल. यासोबतच काही वेळातच राज्याच्या निकालाची टक्केवारी पुढे येईल. आपल्याला हा निकाल बघायचा असेल तर खाली दिलेल्या चाैकोनात आपला परीक्षा क्रमांक टाका आणि निकाल लगेचच पाहा..
-
Maharashtra Board HSC Result : काही मिनिटांमध्ये बोर्डाकडून बारावी परीक्षेचा निकाल जाहीर..
बारावी परीक्षेचा निकाल काही वेळातच जाहीर होईल. 11 वाजता बोर्डाकडून हा निकाल जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे बघायसा मिळत आहे.
-
बारावीचा निकाल पाहा अगदी झटपट इथे… काही क्षणात निकाल हाती..
बारावीचा निकाल पाहा अगदी झटपट इथे…
-
Maharashtra HSC Result 2026 : कोणाच राहणार आघाडीवर..
बारावीच्या निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. काही वेळातच बारावीचा निकाल पुढे येईल. मात्र, या निकालात नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्रेझ हा निकालाबद्दल आहे.
-
बारावीची मार्कशीट या पद्धतीने करा डाऊनलोड..
बारावी परीक्षेचा आज निकाल आहे. ज्याकरिता तुम्ही दुपारी एकला ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहू शकता. तिथे तुमचा रोल नंबर टाका आणि मागितलेली माहिती भरा. त्यानंतर सर्वात खाली तुम्हाल डाऊनलोडचे ऑप्शन येईल, त्यानंतर ती मार्कशीट डाऊनलोड करा.
-
बारावी निकालाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर पूर्ण माहिती..
बारावी निकाल लागण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांन हा निकाल ऑनलाईन पद्धतीने बघता येणार आहे..
-
Maharashtra Board HSC Result 2026 : बोर्डाची 11 वाजता पत्रकार परिषद..
12 वी परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद आहे. त्यामध्ये त्यांच्याकडून विभागनिहाय निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल.
-
Maharashtra Board HSC Result 2026 : बारावीच्या निकालात कोणता विभाग ठरणार अव्वल..
आज बारावी परीक्षेचा निकाल आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने बघू शकणार आहेत. बारावी निकालात कायम कोकण विभाग अव्वल ठरतो. यंदा नक्की कोणता विभाग बाजी मारतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
-
बारावीचा निकाल कुठे पाहणार? जाणून घ्या..
बारावीचा निकाल तुम्ही www.tv9marathi.com आणि mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर पाहू शकता. तिथे तुम्हाला रोल नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतात. तसेच डिजीलॉकर आणि SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे.
-
Maharashtra Board HSC 12th Result : विद्यार्थी कुठे पाहू शकणार आहेत निकाल, जाणून घ्या..
बारावीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहू शकणार आहेत. tv9 मराठीच्या वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
-
Maharashtra Board HSC 12th Result Live : निकालात कोण मारणार बाजी
आज बारावीचा निकाल जाहीर होईल. या निकालात कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरले. किती विद्यार्थ्यांनी शंभरी गाठली, याबाबत अकरा वाजता बोर्डाकडून माहिती दिली जाईल.
-
Maharashtra Board HSC 12th Result Live : बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला
आज बारावीचा निकाल जाहीर होईल. दुपारी 1 वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाईन पद्धतीने बघू शकणार आहेत. त्यापूर्वी बोर्डाची पत्रकार परिषद होईल. विद्यार्थ्यांमध्ये या निकालाबद्दल मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे.
-
Maharashtra Board HSC 12th Result : कोण मारणार बाजी? मुले की मुली..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होईल. काही वेळात निकालाचे अपडेट पुढे येतील. मात्र, यंदाच्या निकालात नक्की कोण बाजी मारणार यावरून चर्चा रंगत आहे. दरवर्षी निकालात मुलीच बाजी मारताना दिसतात.
Published On - May 02,2026 7:51 AM
