‘तिनेच माझ्यातल्या अभिनेत्याला ओळखलं..’,नाना पाटेकर यांनी या दिग्गज अभिनेत्रीला दिले होते श्रेय

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आकस्मिक निधनाने देशभरातील त्यांच्या अभिनयाचे चाहते हळहळले आहेत.त्यांना देशात ओळख मिळण्यास एका दिग्गज मराठी अभिनेत्रीचा हट्ट कारणीभूत ठरला..

तिनेच माझ्यातल्या अभिनेत्याला ओळखलं..,नाना पाटेकर यांनी या दिग्गज अभिनेत्रीला दिले होते श्रेय
nana patekar and smita patil (
| Updated on: Oct 08, 2026 | 6:22 PM

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यातील घरात एकाकी अवस्थेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. नाना पाटेकर हे जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी होते. त्यांना चित्रकलेत रस होता. त्यांनी नाटकातून अभिनयाला सुरुवात केली होती. आणि थिएटरमध्ये विजया मेहता यांनी त्यांना घडवले होते. ते थिएटरच्या दुनियेत चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत येण्यामागे एका दिग्गज मराठी अभिनेत्रीचा महत्वाची रोल होता.

अभिनेते नाना पाटेकर यांना थिएटरकडून चित्रपटात नेण्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मोठी भूमिका निभावली होती. नानाने अनेकदा त्यांच्या चित्रपट प्रवेशाचे श्रेय दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांना दिले आहे. स्मिता पाटील यांनी जर हट्ट धरला नसता तर चित्रपटात आपला प्रवेश झाला नसता असे त्यांनी अनेकदा म्हटले आहे.

Loading...

थिएटरच नानांचे पहिले प्रेम

चित्रपटाआधी नाना यांचे जग थिएटर होते. एका जुन्या मुलाखतीत नानांनी सांगितले की आपण थिएटरच्या जगात आनंदी होतो. कमाई जास्त होत नव्हती परंतू रंगमंचावरील अभिनय करण्याचे वेड इतके होते की त्यांनी दुसरी नोकरी आणि थिएटर याऐवजी थिएटरची निवड केली होती. एक दशकभर ते नाट्यसृष्टीत रममाण होते. त्यांनी अनेक नाटकात काम केले आहे. १९७९ मध्ये विजया मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी ‘हमीदाबाईची कोठी’त काम केले. हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. त्यानंतर ‘महासागर’ आणि ‘पुरुष’ सारख्या नाटकात नानांचा अभिनय लाजबाव ठरला. स्मिता पाटील त्यावेळी मराठीतील धाडसी अभिनेत्री होती. स्मिता पाटील यांनी नानाला चित्रपटात काम करण्याची गळ घातली.

‘गमन’ चित्रपटातून हिंदीत चमकले

नाना पाटेकर आणि स्मिता पाटील यांची मैत्री चांगली होती. स्मिता पाटील यांनी नाना यांच्यातील अभिनयाला ओळखले होते. त्यांनी नानाला चित्रपटात काम करण्यास प्रेरित केले. अखेर नाना पाटेकर स्मिता पाटील यांच्या सोबतच 1978 मध्ये ‘गमन’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर चमकले. आणि त्यांचा चित्रपटातील प्रवास सुरु झाला आहे. मराठी चित्रपटात नानांचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला त्यांना हिंदीत मुख्य कॅरेक्टर वा आव्हानात्मक भूमिकांसाठी संघर्ष करावा लागला. त्यानंतर त्यांनी छोटे-छोटे रोल आणि चरित्र भूमिकांत आपली छाप पाडली. २०१५ मध्ये नाना यांनी एका मुलाखतीत सांगितले. ‘आज की आवाज’ या चित्रपटासाठी त्यांचे नाव स्मिता पाटील यांनी चित्रपट रवी चोपडा यांना सुचवले. नाना पाटेकर यांचे दीर्घ डायलॉग आठवणीत ठेवून म्हणण्याची नानांची शैली पाहून स्मिता पाटील चकीत व्हायच्या. त्यांनीच त्यांच्यातील अभिनेता ओळखले आणि हिंदी चित्रपटाला एक महान स्टार मिळाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us