Tamannaah Bhatia | ‘बाहुबली’ अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण, हैद्राबादच्या रुग्णालयात दाखल

अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. या आधी तिने आपल्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

Tamannaah Bhatia | ‘बाहुबली’ अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण, हैद्राबादच्या रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 6:45 PM

मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. या आधी तिने आपल्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. आता तमन्नाचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positiv) आला आहे. तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) तिच्या आगामी वेब-सीरिजच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला होती. चित्रीकरणादरम्यान तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती (Actress Tamannaah Bhatia tested Corona Positive).

तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) पुढील उपचारांसाठी हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, देशभरातील चाहते सोशल मीडियावर, तिला लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा पाठवत आहेत. या बातमीने तिच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना धक्का बसला आहे. ट्विटरवर तिच्यासाठी ‘गेट वेल सून’ संदेशासह सगळे प्रार्थना करीत आहेत.

ऑगस्ट महिन्यात तमन्नाने (Tamannaah Bhatia) ट्विट करत आपल्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी चाह्त्यांसोबत शेअर केली होती. ‘माझ्या कुटुंबियांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने, खबरदारी म्हणून आम्ही सर्वांनी कोरोना चाचणी केली. आणि या चाचणी दरम्यान माझ्या आई-वडिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत’, असे ट्विट तिने केले होते. त्यावेळी तमन्नासह तिच्या स्टाफ मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, आता चित्रीकरणादरम्यान तमन्नालाही कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. (Actress Tamannaah Bhatia tested Corona Positive)

चित्रीकरणासाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत होती तमन्ना

वेब-सिरीजच्या चित्रीकरणासाठी हैद्राबादला रवाना होण्यापूर्वी तमन्ना (Tamannaah Bhatia) मुंबई होती. लॉकडाऊन दरम्यान ब्युटी ट्रीटमेंटसाठी एका सलूनमध्ये जात असताना, ती माध्यमांच्या कॅमेरात कैद झाली होती. जीन्स-टीशर्टमध्ये नो-मेकअप लूक फ्लाँट करणाऱ्या तमन्नाने मास्क परिधान केला होता.

या बॉलिवूड कलाकारांनाही झालेली कोरोनाची लागण

संपूर्ण जगभरात दहशत पसरवलेल्या कोरोना विषाणूने (Corona) बॉलिवूडकरांनाही हैराण केले. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, रेखा, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, आफताब शिवदासनी, किरण कुमार या कलाकारांनाही कोरोनाची लागण (Corona Positive) झाली होती. संगीतकार वाजिद खानचा कोरोनाने बळी घेतला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन्ही बंधूंना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संसर्गामुळे त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

(Actress Tamannaah Bhatia tested Corona Positive)

संबंधित बातम्या :

The Rock | ‘द रॉक’ ड्वेन जॉन्सनला कोरोनाची लागण, पत्नी आणि दोन मुलीही विळख्यात

Arjun Kapoor Corona | अभिनेता अर्जुन कपूरला कोरोना, डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाईन

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.