
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. तारा सुतारिया रणबीर कपूरचा भाऊ आदर जैन याला डेट करत होती. दोघे लग्न करणार असल्याची चर्चा असताना दोघांचे ब्रेकअप झाले. आता तारा सुतारियाच्या लव्ह लाईफबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे आलीये. चक्क राजकारणाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तारा सुतारिया आता डेट करतंय. तिने एका शोमध्ये याबद्दल सांगून टाकलंय. तारा सुतारिया वीर पहाडिया डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.
नुकताच शोमध्ये बोलताना तारा सुतारिया हिने म्हटले की, मी माझ्या रिलेशनशिपमध्ये खूपच जास्त आनंदी आहे. मी खूप चांगल्या स्थितीत आहे जिथे मला खूप आनंद होत आहे. हे चौधवीच्या चांदचे भाव आहेत…प्रेम माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट नक्कीच आहे आणि माझे त्याला नेहमीच प्राधान्य आहे.
ती पुढे म्हणाली की, मी नक्कीच भाग्यवान आहे की, मला माझ्या प्रेमावर विश्वास होता… मी अशा लोकांपैकी एक आहे जे प्रेमावर विश्वास ठेवतात…मात्र, यावेळी तारा सुतारिका हिने वीर पहाडिया याचे नाव घेतले नसले तरीही ती कोणाबद्दल बोलत आहे, याचा थेट अंदाज सर्वांना आल्या. आदर जैनसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने वीर पहाडियाला डेट करण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जातंय.
वीर पहाडिया याचे नाव यापूर्वी सारा अली खान हिच्यासोबत जोडले गेले आहे. वीर पहाडिया याचा भाऊ शिखर पहाडिया हा जान्हवी कपूर हिला डेट करतोय. काही दिवसांपूर्वीच दोघे तिरूपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. आता त्यामध्ये तारा सुपारिया आणि वीर पहाडिया डेट करत असल्याचे सांगितले जातंय. अनेकदा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत.
वीर पहाडिया आणि शिखर पहाडिया हे दोघे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या मोठ्या मुलीचे हे दोन्ही मुले असून मावशी प्रणिती शिंदे हिचा निवडणूक प्रचारासाठी शिखर पहाडिया हा काही दिवसांपूर्वीच मैदानावर उतरला होता. आता तारा सुतारिया महाराष्ट्राची सून होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.