राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर… कसा असेल महाराष्ट्र? अभिनेत्रीच्या उत्तराची सगळीकडे चर्चा!

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरे यांच्याविषयी तिचे मत व्यक्त केले आहे. राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर काय होईल, या प्रश्नावर ती भरभरून बोललीय.

राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर... कसा असेल महाराष्ट्र? अभिनेत्रीच्या उत्तराची सगळीकडे चर्चा!
raj thackeray
| Updated on: Jul 12, 2025 | 8:17 PM

Tejaswini Pandit On Raj Thackeray : तेजस्वीनी पंडित या मराठमोळ्या अभिनेत्रीला आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ती वेळोवेळी राजकीय, सामाजिक विषयांवर आपलं मत मांडत असते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी तिने अनेकवेळा भेटही घेतलेली आहे. मनसे, राज ठाकरे यांच्या राजकारणावर भाष्य करणारा येक नंबर या चित्रपटाची निर्मितीही तिने केलेली आहे. दरम्यान, राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर तुला काय वाटेल, महाराष्ट्र कसा असेल असे तिला नुकतेच एका मुलाखतीत विचारण्यात आले. यावर तिने उत्तरही दिलंय.

राज ठाकरे हे महाराष्ट्राला…

तेजस्वीनी पंडितचा नुकताच अजब-गजब या यूट्यूब चॅनेलवर एक पॉडकास्ट आला आहे. यामध्ये तिने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलंय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणावर ती भरभरून बोललीय. यावेळी तिने राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.  राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र खूप छान होईल. त्यांची दूरदृष्टी खून छान आहे. मी त्यांच्याशी बोललेली आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानी ठेवतात. राज ठाकरे हे महाराष्ट्राला कुटुंबापेक्षाही वर ठेवतात, असं मत तिने व्यक्त केलंय. 

शरद पवार यांच्या मेंदूवर संशोधन करायला हवे

तसेच, मला अनेक राजकारणी आहेत ज्यांचं बोलणं मला खूप आवडतं. नितीन गडकरी खूप छान बोलतात. शरद पवार यांच्या मेंदूवर संशोधन करायला हवे, असे मला वाटतं. आपल्या राज्यात अनेक मोठे राजकीय नेते आहेत. दिवंगत नेते विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे प्रभावी भाषण करायचे, असंही ती म्हणाली.

राज ठाकरे जे बोलतात ते…

पूर्वीचे राजकारण, राजकीय नेते वेगळे होते. तेव्हा तत्त्वांना महत्त्व दिलं जायचं. आता थोडसं बिघडल्यासारखं वाटतं. राज ठाकरे जे बोलतात, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून आल्यासारखं वाटतं, असं कौतुकही तिने केलंय.  

 माझा राजकारणाविषयी अभ्यास आहे असा नाही. पण मी राजकारण पूर्वीपासून बघत आले आहे. त्यामुळेच मी हे मत माडंत आहे, असं स्पष्टीकरणही तिने दिले. मला ज्या गोष्टी पटलेल्या असतात त्या बाजूने मी उभी राहते. राजकारण्यांनी एखादी चांगली गोष्ट केली की मी त्या बाजूनेही पोस्ट करतेच. मला बोलण्याचा अधिकार आहे. कारण मी या राज्यात राहते, देशात राहते. मी या देशाची नागरिक आहे. मी वेळेवर करही भरते, असंही तेजस्वी पंडित म्हणाली.