AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush | ‘आदिपुरुष’वर भारी पडला प्रेक्षकांचा राग; वीकेंडनंतर बॉक्स ऑफिसवर आपटला प्रभासचा चित्रपट

500 कोटी खर्च करून केजीएफच्या खाणीसारखी काळी कुट्ट लंका, मायावी राक्षसांचा चित्रविचित्र लूक, ड्रॅगनसदृश प्राणी, मुन्नाभाईसारखा चालणारा रावण, इतर कलाकारांचं हास्यास्पद चित्रीकरण अशा अनेक गोष्टींवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

Adipurush | 'आदिपुरुष'वर भारी पडला प्रेक्षकांचा राग; वीकेंडनंतर बॉक्स ऑफिसवर आपटला प्रभासचा चित्रपट
Adipurush box officeImage Credit source: Twitter
| Updated on: Jun 20, 2023 | 11:13 AM
Share

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून देशभरात आणि परदेशातही वाद सुरू आहे. याच वादाचा आणि नकारात्मक प्रतिक्रियांचा फटका या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शनवर बसला आहे. ‘आदिपुरुष’ची ॲडव्हान्स बुकिंग जबरदस्त झाली होती. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात 140 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मात्र आता हळूहळू कमाईच्या आकड्यात घट होताना दिसतेय. चित्रपटाच्या विरोधाचा परिणाम चौथ्या दिवसाच्या कमाईत स्पष्ट पहायला मिळाला.

चौथ्या दिवसाची कमाई-

‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी देशभरात 86.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवसाची कमाई 100 कोटी रुपये इतकी झाली होती. तिसऱ्या दिवशी कमाईत थोडी घट झाली. हा आकडा 65 कोटींपर्यंत पोहोचला. त्यानंतर आता चौथ्या दिवशी कमाईच्या आकड्यात तिप्पट घट झाली. ‘आदिपुरुष’ने सोमवारी फक्त 20 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या नकारात्मक रिव्ह्यूचा फटका कमाईला बसतोय, हे स्पष्ट झालं आहे.

केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटावरून वाद सुरू आहे. काठमांडूमध्ये आदिपुरुषच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. सीतेबद्दलच्या एका डायलॉगवरून तिथल्या महापौरांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता चित्रपटाचे निर्माते टी-सीरिज यांच्याकडून महापौर बालेंद्र शाह यांना माफीनामा पाठवण्यात आला आहे.

रामायण कसं दाखवू नये याचं मूर्तिमंत उदाहरण ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळाल्याची टीका अनेकांनी केली आहे. 500 कोटी खर्च करून केजीएफच्या खाणीसारखी काळी कुट्ट लंका, मायावी राक्षसांचा चित्रविचित्र लूक, ड्रॅगनसदृश प्राणी, मुन्नाभाईसारखा चालणारा रावण, इतर कलाकारांचं हास्यास्पद चित्रीकरण अशा अनेक गोष्टींवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंहने शेषची (लक्ष्मण) भूमिका साकारली आहे. या चित्रपटात देवदत्त नागे, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे अशा मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?