Adipurush हा सर्वात भयानक तमाशा, सैफ अली खानला या अभिनेत्याने सुनावले खडेबोल

आदिपुरुष सिनेमावर अनेक जण टीका करत आहेत. या यादीत आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश झालाय. त्यांनी निर्माते, लेखक आणि कलाकारांवर टीकास्त्र सोडलंय.

Adipurush हा सर्वात भयानक तमाशा, सैफ अली खानला या अभिनेत्याने सुनावले खडेबोल
| Updated on: Jun 20, 2023 | 11:07 PM

मुंबई : नुकताच प्रदिर्शित झालेल्या आदिपुरुष ( Adipurush ) या सिनेमावर अनेक लोकं टीका करत आहेत. अनेकांनी सिनेमावर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता मुकेश खन्ना यांनी ही सिनेमावर सडकून टीका केलीये. सर्वात मोठा आणि भयानक तमाशा म्हणून त्यांनी या सिनेमावर टीका केली आहे. त्यांनी ओम राऊत आणि मनोज मुंतशीर यांनाही खडसावले आहे. ANI शी बोलताना मुकेश खन्ना म्हणाले की, 100 कोटी देशवासीयांनी याचा विरोध केला पाहिजे.

मुकेश खन्ना यांनी एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आदिपुरुष हा एक चांगला विनोदी चित्रपट आहे, त्यामुळे रामायणावर आधारित चित्रपट हा विनोदी चित्रपट कसा असू शकतो याचा विचार केला. यानंतर त्यांनी स्वत: चित्रपटाबद्दल संशोधन सुरू केले.

ओम राऊत आणि मनोज मुनताशीर यांच्यावर टीका

आदिपुरुष बद्दल बोलताना मुकेश खन्ना म्हणाले की, “यापेक्षा मोठा तमाशा असूच शकत नाही. आपल्या रामायणाचा या पेक्षा मोठा अपमान असूच शकत नाही. चित्रपट पाहून मला समजले की दिग्दर्शक ओम राऊत यांचा ज्ञानाशी काही संबंध नाही. थोर लेखक, शिरोमणी विचारवंत लेखक मनोज मुंतशीर यांनी आपल्या लेखनाने रामायण कलियुगी बनवले आहे.”

रावणाच्या भूमिकेत दिसणाऱ्या सैफ अली खान याचाही मुकेश खन्ना यांनी खरपूस समाचार घेतला. “रावण भितीदायक असू शकतो, पण शिवदत्त – चंद्रकांताचा विश्वपुरुष कसा दिसतो? तो एक पंडित होता. कोणी रावणाची कल्पना करून त्याची अशी रचना कशी करू शकतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.”

सैफ अली खानला फटकारले

“मला आठवतं, जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा सैफ म्हणाला होता की तो व्यक्तिरेखा विनोदी करेल. मी तेव्हाही म्हटलं होतं – ‘तुम कौन होते हो हमारे कापवी को बदलने वाले,’ तुमच्या धर्मात करा, डोक्यावर पडेल’ खरं तर, रावणाच्या लूकमध्ये फारसा बदल झालेला नाही आणि निर्मात्यांनी त्याच्यामधून कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला आहे.”

100 कोटी हिंदू अजूनही जागे नाहीत.

मुकेश खन्ना म्हणाले की, देशातील लोकांनी हा चित्रपट थांबवण्यासाठी पावले उचलली नाहीत, तर मला असे वाटेल की 100 कोटी हिंदू अजून जागे झालेले नाहीत.