
Bollywood Actress Life : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ सिनेमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अंजली आनंद हिने एका कार्यक्रमात स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. वडिलांच्या निधनानंतर स्वतःवर आलेल्या संकटाबद्दल अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री लहान असताना तिच्यावर डान्स टिचरने अत्याचार केले…
अंजलीने उघड केले की लहानपणी तिच्या डान्स टीचरने तिचं लैंगिक शोषण केलं होतं. हा छळ सुमारे सहा वर्षे चालला. अभिनेत्री म्हणाली, ‘मी आठ वर्षांची होती आणि ही घटना माझ्या वडीलांचं निधन झाल्यानंतर घडली. टीचर मला कायम म्हणायचा, मी तुझा बाप आहे… मी देखील त्याच्यावर विश्वास ठेवला कारण मला महिती नव्हतं… त्यानंतर त्याने हळू – हळू वाईट प्रकार करण्यास सुरुवात केली. आधी माझ्या गालावर त्याने किस केलं. त्यानंतर ओठांना स्पर्श केला… कायम म्हणायचा मी तुझा वडील आहे आणि वडील असंच करतात… मला नव्हतं माहिती बाप – लेकीचं नातं कसं असतं… मी जे काही मागायची तो मला द्यायचा…’
अंजली पॉडकास्टमध्ये म्हणाली, ‘टीचरने माझ्या आयुष्यावर नियंत्रण करण्यास सुरुवात केली. तो मला मुलींसारखे कपडे घालू देत नव्हता किंवा केस मोकळे ठेवू देत नव्हता. त्याला माझ्याकडे कोणीही आकर्षित व्हावं असं वाटत नव्हतं. तो माझे मेसेज आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचा… मला शाळेतून घ्यायला यायचा… मी बाहेर जाऊ नये म्हणून ट्यूशन टीचरला देखील घरी बोलवायचा… तो सगळीकडे का आहे याचा सर्वांनाच प्रश्न पडायचा, पण कोणीही त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला नाही. ‘
अंजली हिने सांगितल्यानुसार, जेव्हा तिच्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा तिची भेट तिच्या वडिलांच्या मित्राच्या मुलासोबत झाली. त्यानंतर पहिल्या भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. अभिनेत्री म्हणाली, ‘दोन वर्ष आम्ही एकमेकांना डेट केलं… माझ्या पहिला बॉयफ्रेंडने माझी टीचरच्या तावडीतून सुटका केली. ब्रेकअपनंतर मी त्याच्यासोबत चालायला गेली… तेव्हा मी त्याला सर्वकाही सांगितलं आणि त्याचे आभार मानले…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.