AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मिका मंदाना, कतरिना नंतर आता काजोललाही डीपफेकचा फटका, ‘तसले’ फोटो व्हायरल

रश्मिका मंदाना, कतरिना कैफ नंतर आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा डीप फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या नव्या व्हिडीओमुळे चांगली खळबळ माजली आहे.

रश्मिका मंदाना, कतरिना नंतर आता काजोललाही डीपफेकचा फटका, 'तसले' फोटो व्हायरल
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2023 | 2:40 PM
Share

Kajol DeepFake Video : अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत होती. इंटरनेटवर तिचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ माजली. त्यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत तंत्रज्ञानाच्या या गैरवापराबाबत चिंताही व्यक्त केली होती. बॉलिवूडचे बिग अर्थात अमिताभ बच्चन यांनीही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण शांत होतं ना होतं तोच अभिनेत्री कतरिना कैफचाही असाच डीपफेक फोटो समोर आला आणि वातावरण पुन्हा ढवळून निघालं.

डीपफेक फोटोमुळे सगळेच त्रस्त असताना आता आणखी एक, धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आणि यावेळी टार्गेट आहे प्रसिद्ध अभिनेत्री काजोल. रश्मिकानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलही या तंत्राची शिकार झाली आहे. काजोलचा एक अश्लील व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

काजोललाही बसला डीफफेकचा फटका

या व्हिडिओमध्ये डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. डीपफेकने एडिट करण्यात आलेल्या या व्हिडीओत काजोलचा चेहरा लावलेली तरूणी कपडे बदलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यामुळे अभिनेत्रीचे लाखो चाहते नाराज झाले असून अनेकांनी निषेधाच्या कमेंट्सही केल्या आहेत.

मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला काजोल नसून एक सोशल इन्फ्लुन्सर आहे. तिने हा व्हिडीओ तिच्या टिक-टॉकवर शेअर केला होता, जो प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ नीट लक्ष देऊन पाहिला तर त्यातील महिलेचा चेहरा अनेक वेळा बदलताना दिसेल.

रश्मिकासह अनेकांना बसला डीफफेकचा फटका

या डीपफेक टेक्नॉलॉजीचा फटका रश्मिका मंदानासह, कतरिना कैफ तसेच क्रिकेटपटून सचिन तेंडुलकरची मुलगी सारा, आणि शुबमन गिल यांनाही बसला. काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल (shubaman gill) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये ते दोघेही एकत्र दिसत होते.. फोटोसाठी पोझ देताना सारा शुभमन गिलला मिठी मारतेय असा तो फोटो आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा आणि शुबमनच्या डेटिंगच्या चर्चा सुरू असून त्याच दरम्यान हा फोटो समोर आल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण खरं सांगायचं तर सारा आणि शुबमनच्या त्या फोटोमध्ये काहीच तथ्य नव्हतं. हा ओरिजनल फोटो नसून तो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने मॉर्फ करण्यात आला होता.

रश्मिका प्रकरणात पोलिसांची कारवाई 

दरम्यान रश्मिका मंदान्ना प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबरला एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर 15 नोव्हेंबरला आरोपी सापडला. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने बिहारमधील एका 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...