मुलाच्या निधनाची तार आली, पण शाहिरी कार्यक्रम थांबले नाही; शाहीर इंगळेंचा हा किस्सा वाचाच!

कलावंत कोणताही असो, त्याच्यावर दु:खाचा कितीही डोंगर कोसळला तरी त्याला प्रेक्षकांना सामोरे जावंच लागतं. (after son death Shahir D.R. Ingle had continue program, read details)

मुलाच्या निधनाची तार आली, पण शाहिरी कार्यक्रम थांबले नाही; शाहीर इंगळेंचा हा किस्सा वाचाच!
Shahir D.R. Ingle
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 6:40 PM

मुंबई: कलावंत कोणताही असो, त्याच्यावर दु:खाचा कितीही डोंगर कोसळला तरी त्याला प्रेक्षकांना सामोरे जावंच लागतं. ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वाला जागून त्यांना कार्यक्रम करावेच लागतात. शाहीर डी. आर. इंगळेही त्याला अपवाद ठरले नाही. त्यांच्याही आयुष्यात असाच किस्सा घडला. त्याला ते धीराने सामोरेही गेले. काय होता हा किस्सा? वाचाच. (after son death Shahir D.R. Ingle had continue program, read details)

जयंतीचा कार्यक्रम अन् तार आली

1972-73चा प्रसंग असेल. शाहीर डी. आर. इंगळे यांचा नांदेडला कार्यक्रम होता. भीम जयंतीमुळे 14 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत त्यांचे मराठवाड्यातील कार्यक्रम बुक होते. मराठवाड्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व मामा येवले यांनी हे कार्यक्रम घडवून आणले होते. त्यांच्याकडेच शाहीर आणि त्यांची वादक मंडळी उतरले होते. त्याचवेळी मामांच्या घरी शाहिरांच्या नावाने तार आली. त्याकाळी तार येणं म्हणजे हमखास दु:खाची बातमी येणं हे समीकरण होतं. झालंही तसंच. या तारेत शाहिरांचा एक वर्षाचा मुलगा मरण पावल्याचं लिहिलं होतं. पण घरी जाणार कसं? कार्यक्रम तर फिक्स होते. बिदागीही घेतली होती. त्यामुळे कार्यक्रम रद्द करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे शाहिरांच्या सहकाऱ्यांनी मुलगा वारल्याची बातमी शाहिरांपासून लपवून ठेवली.

इथे मेले कोटी कोटी…

15 दिवस सर्व कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी भीत भीतच शाहिरांना ही तार दाखवली. तार वाचून शाहीर क्षणभर स्तब्ध झाले. डोळ्यासमोर निरागस मुलगा आणि अख्खं कुटुंब उभं राहिलं. शाहीर रडत नव्हते, पण मनातून कोलमडून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सर्व काही स्पष्ट सांगत होते. शाहिरांनी मन घट्ट केलं. उशिरा तार सांगितल्याबद्दल त्यांनी सहकाऱ्यांना ब्र शब्दानेही दुखावले नाही. कारण त्यांच्या समोर होता गाडगेबाबांचा आदर्श. गाडगेबाबांचा मुलगा गेल्यावर त्यांना किर्तन सुरू असताना मुलगा गेल्याची वार्ता सांगण्यात आली. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले,

इथे मेले कोटी कोटी, काय रडू मी एकासाठी…

गाडगेबाबांचं हे सत्यवचन शाहिरांना आठवलं. त्यांनी मनाला सावरलं आणि त्याच अवस्थेत सामानाची बांधाबांध करून गावाकडचा रस्ता धरला. एव्हाना संपूर्ण गावाला शाहिरांचा मुलगा गेल्याची वार्ता कळली होती. त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी अख्खा गाव एसटी स्टँडवर लोटला होता. गावकऱ्यांनाही हुंदके आवरत नव्हते. आज हा प्रसंग आठवल्यावर शाहिरांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. आजही त्यांच्या मनाची घालमेल होत असल्याचं दिसून येतं.

भीमराज की बेटी सर्वप्रथम गायलं

उमर मे बाली भोली भाली, शील की झोली हूँ, भीमराज की बेटी मै तो, जयभीमवाली हूँ…

प्रतापसिंग बोदडे यांचं हे सर्वात लोकप्रिय गाणं. गायिका शकुंतला जाधव यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. गाणं लोकप्रियही झालं. त्यानंतर गायिका निशा भगत यांनीही हे गाणं लोकप्रिय केलं. मात्र, हे गाणं सर्वात आधी डी. आर. इंगळे यांनी गायलं होतं. हे गाणं शकुंतला जाधव यांच्या आवाजात रेकॉर्ड होण्यापूर्वी खामगाव येथे एका कार्यक्रमात इंगळे यांनी सर्वप्रथम गायलं होतं.

वामनदादांच्या खंजीरीची साथ

एकदा खामगावात शाहिरांचा कार्यक्रम होता. शाहिरांचा सूरही चांगला लागला होता. त्याचवेळी महाकवी वामनदादा कर्डक यांनी खंजीरी वाजवून शाहिरांना साथ दिली. त्यामुळे शाहिरांना चांगलेच स्फुरण चढले होते. साक्षात महाकवीची साथ लाभल्याने शाहिरांनी आणखी जोशात कार्यक्रम करून सर्वांची मने जिंकून घेतली होती. पुढे त्यांनी गीते वामनांची हा वामनदादांच्या गीतांवरील गायनाचा कार्यक्रमही केला होता. वामनदादांच्या गाण्यांवर असा कार्यक्रम करणारे ते एकमेव शाहीर आहेत. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर वामनदादाही गहिवरून गेले होते, असं ते सांगतात. प्रतापसिंग बोदडे, विजय वानखेडे, किसन गवळी आणि स्वत: शाहिरांनी हा कार्यक्रम केला होता. साहित्यिक सुरेश साबळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं होतं.

तीन तीन दिवस रियाज

कोणताही कार्यक्रम करण्यासाठी त्या कार्यक्रमाच्या आधी शाहीर तीन-तीन दिवस रियाज करतात. ‘करेक्ट कार्यक्रम’ होण्यासाठी रियाज महत्त्वाचा आहे. त्यामुळे लोकांचं प्रबोधन आणि मनोरंजनही होतं. शिवाय गायन पार्टीचा लौकिकही वाढतो, असं ते सांगतात.

शाहिरांची गाणी

लसूण, कांदा, मिरची, माझी कमाई विहिरीवरची…

आणि

खीर गार झाली, बोलली सुजाता, एक तरी घास घे, घे रे भगवंता…

आणि

सेवेमध्ये आई तुझं लेकरू, चुकले तरी राग नको धरू… (साभार, आंबेडकरी कलावंत) (after son death Shahir D.R. Ingle had continue program, read details)

संबंधित बातम्या:

‘जलसे’ जिवंत राहण्याची तळमळ, शाहिरीत नवे प्रयोग; वाचा, शाहीर इंगळे आणि त्यांची जडणघडण

जिजामाता महोत्सवात ‘शाहीर’ म्हणून उदय; वाचा, शाहीर डी. आर. इंगळेंची कहाणी

आनंद शिंदेंच्या ‘नवीन पोपटा’ इतकंच सुषमादेवींचं ‘हे’ गाणंही लोकप्रिय; गाण्याचा किस्साही लाजवाब, वाचाच!

(after son death Shahir D.R. Ingle had continue program, read details)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.