सोनाक्षीनंतर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार दुसऱ्या धर्मात लग्न; मुस्लीम बॉयफ्रेंडने दिली हिंट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानंतर आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्या धर्मात लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या मुस्लीम बॉयफ्रेंडने याबद्दलची हिंट दिली आहे. बिग बॉसच्या चौदाव्या सिझनमध्ये ही जोडी सर्वाधिक चर्चेत होती.

सोनाक्षीनंतर 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार दुसऱ्या धर्मात लग्न; मुस्लीम बॉयफ्रेंडने दिली हिंट
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 9:25 AM

गेल्या काही दिवसांत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावरून मोठी चर्चा सुरू झाली. सोनाक्षीने प्रियकर झहीर इक्बालशी लग्न केलं. ती हिंदू आणि झहीर मुस्लीम असल्याने या लग्नाला अनेकांनी विरोध केला होता. किंबहुना सोनाक्षीचे कुटुंबीयसुद्धा आधी नाराज होते असं म्हटलं गेलं. त्यानंतर आता सोनाक्षीप्रमाणेच आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री आंतरधर्मीय लग्न करणार असल्याचं समजतंय. ‘बिग बॉस’च्या घरात या अभिनेत्रीचं नातं सर्वाधिक चर्चेत होतं. त्यानंतरही सोशल मीडियाद्वारे तिने नेहमीच बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून जास्मिन भसीन आहे. ‘बिग बॉस’च्या चौदाव्या सिझनमध्ये जास्मिन आणि अली गोणी हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करू लागले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अलीने जास्मिनसोबतच्या लग्नाची हिंट दिली आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत अलीला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “आई म्हणतेय की आता लग्न कर. जास्मिन लग्नासाठी तयार आहे. मीसुद्धा तयार आहे. कदाचित तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी कळेल.” यानंतर अलीला विचारण्यात आलं की तो यावर्षी लग्न करणार आहे का? त्यावर तो म्हणाला, “कदाचित असू शकतं.”

हे सुद्धा वाचा

अली आणि जास्मिनची पहिली भेट 2018 मध्ये मुंबईत झाली होती. हे दोघं रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 9’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. अर्जेंटिनामध्ये शूटिंगसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांची मुंबईत भेट झाली होती. त्यानंतर शोसाठी शूटिंग करताना त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

अली गोणीने ‘ये है मोहब्बतें’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारली होती. तर जास्मिनला ‘दिल से दिल तक’ आणि ‘नागिन 4’ या मालिकांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकांसोबतच जास्मिन पंजाबी गाणी आणि चित्रपटांमध्येही काम करते. पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अली गोणीचा भाऊ अर्सलान गोणी हा अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानला डेट करतोय.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.