72 Hooren | ‘तुम सीधे जन्नत में जाओगे…’, The Kerala Story नंतर ’72 हूरें’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

'द केरळ स्टोरी' नंतर '72 हूरें' सिनेमाच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांचं रहस्य येणार समोर? '72 हूरें' सिनेमाच्या फर्स्ट लूकनंतर विवेक अग्निहोत्री यांची खळबळजनक प्रतिक्रिया

72 Hooren | तुम सीधे जन्नत में जाओगे..., The Kerala Story नंतर 72 हूरें सिनेमा वादाच्या भोवऱ्यात
| Updated on: Jun 05, 2023 | 2:06 PM

मुंबई : दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा अनेक वाद आणि विरोधानंतर ५ मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होवून पाच आठवडे झाले आहेत. तरी देखील सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच सिनेमाच्या कथेबद्दल बरेच वाद झाले. या सिनेमात अशा ३ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांचं प्रथम धर्मांतर करण्यात येतं. त्यानंतर त्यांना आयएसआय या दहशतवादी संघटनेत भरती करण्यात येतं. सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे प्रेक्षकांकडून कथेला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाला बॅन करण्याची देखील मागणी करण्यात आली. तर काही लोकांना प्रोपगंडा म्हणत सिनेमाचा विरोध केला.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमावरून निर्माण झालेल्या वादाचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नाही. अशात ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर ’72 हूरें’ प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. सध्या सर्वत्र ’72 हूरें’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ’72 हूरें’ सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सर्वत्र ’72 हूरें’ सिनेमाची चर्चा आहे…

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ‘तुमने जो जिहाद का रास्ता चुना हैं… वो तुम्हे जन्नत की तरफ ले जाएंगा…’ असा पहिला डायलॉग आहे. ’72 हूरें’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर यांच्या खांद्यावर आहे. पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

 

 

’72 हूरें’ सिनेमा दहशतवाद आणि ‘लव्ह जिहाद’वर बनलेला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाप्रमाणेच चर्चेच आहे. सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केल्यानंतर अशोक पंडित ट्विट करत म्हणाले, ‘सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. दहशतवादी गुरूंनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 72 हूरें भेटण्याऐवजी तुम्ही क्रूरपणे मृत्यूचे शिकार झालात तर?’

ट्विट करत अशोक पंडीत यांनी सिनेमा ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचं देखील सांगितलं आहे. त्यांच्या ट्विटवर अनेक जण कमेंट आणि लाईक्स करत प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ’72 हूरें’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. यावर ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक पंडीत यांचं ट्विट रिट्विट करत विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘अशोक पंडीत तुम्हाला शुभेच्छा… सिनेमा चित्रपटगृहात दमदार कामगिरी करेल…’ सध्या सर्वत्र ’72 हूरें सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकनंतर चाहते सिनेमाच्या ट्रेलर, ७ जुलैच्या प्रतीक्षेत आहेत.