संजयच्या निधनानंतर करिश्माला भेटायला गेले सैफ-करीना, लपवला चेहरा; अमृता-मलायकाने व्यक्त केला शोक
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरवर दु:चा डोंगर कोसळला आहे. तिचा पूर्व पती संजय कपूरचे निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर करिश्माला भेटण्यासाठी काही स्टार गेले आहेत.

करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि उद्योगपती संजय कपूरचे गुरुवारी रात्री निधन झाले. पोलो खेळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. या बातमीने करिश्मा कपूरला मोठा धक्का बसला आहे. करिश्माचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार या दु:खाच्या प्रसंगी तिला पाठींबा देताना दिसत आहेत. करिश्माची बहीण करीना कपूर, भावोजी सैफ अली खान आणि जवळची मैत्रीण मलायका अरोरा यांनी रात्री उशिरा करिश्माच्या घरी जाऊन तिचे सांत्वन केले. करीना आणि तिचा पती सैफ अली खान गुरुवारी मध्यरात्री करिश्माच्या घरी जाताना दिसले होते. तसेच, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांनाही करिश्माची भेट घेतली.
अमृता अरोराचा पती शकील लडक देखील तिच्यासोबत होता. व्हिडीओमध्ये, मलायका अरोरा काचेच्या दरवाज्यामागे उभी राहून आपल्या कुटुंबाशी बोलताना दिसत आहे. दुसऱ्या एका क्लिपमध्ये मलायका अमृताच्या मुलासोबत कारच्या मागील सीटवर बसलेली दिसली. ती फोटोग्राफर्सपासून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. करीना आणि सैफ यांना करिश्मा यांच्या घराबाहेर पाहिले गेले, त्यांच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्ट दिसत होते.
View this post on Instagram
करीनाने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला
करिश्माच्या घरातून निघाल्यानंतर करीना कपूर खानने फोटोग्राफर्सपासून चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. करिश्माने अद्याप पूर्व पतीच्या निधनावर कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. विशेष म्हणजे, करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचे गुरूवारी रात्री निधन झाले. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, पोलो खेळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तो ५३ वर्षांचे होते.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा २०१6 मध्ये झाला होता घटस्फोट
संजय कपूरच्या निधनाची माहिती सुहेल सेठ यांनी केली. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंट X वर निधनाबद्दल शोक व्यक्त करताना लिहिले, “संजय कपूर यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. त्यांचे आज इंग्लंडमध्ये निधन झाले. एक दुर्भाग्यपूर्ण नुकसान आणि त्यांच्या कुटुंब व सहकाऱ्यांप्रती खूप संवेदना… ओम शांती.” संजय आणि करिश्मा यांनी २००३ मध्ये लग्न केले होते आणि त्यांचा घटस्फोट जून २०१६ मध्ये झाला होता.