थप्पड ! महेश मांजरेकरच्या आयुष्यातला मुर्खपणा, वाचा काय आहे प्रकरण?

| Updated on: Jan 19, 2021 | 5:39 PM

प्रसिद्ध अभिनेते आणि बॉलिवूडचे दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यावर एका व्यक्तीने चापट मारून शिवीगाळ केल्याचा आरोप केला.

थप्पड ! महेश मांजरेकरच्या आयुष्यातला मुर्खपणा, वाचा काय आहे प्रकरण?
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यावर एका व्यक्तीने चापट मारून शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे आणि महेश मांजरेकर यांच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे भांडण कारला धडक मारल्यामुळे सुरू झाले आणि तिथेच हाणामारी देखील झाली, त्यानंतर महेश मांजरेकर यांनी आता या संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. महेश मांजरेकर यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी फिर्यादी व्यक्तीला गाडीच्या खाली उतरून त्याच्या कानाखाली चापट मारत शिवीगाळ केला आहे. (Against actor Mahesh Manjrekar Filed a crime at the police station)

त्या व्यक्तीकडे याचा व्हिडिओ देखील असल्याचे सांगितले जात आहे. हे प्रकरण 15 जानेवारीच्या रात्रीचे आहे. स्पॉटबॉयशी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, ‘ही संपूर्ण घटना अत्यंत मूर्खपणाची आहे. कोणीतरी मागून माझ्या गाडीला धडक दिली. त्यावेळी मला वाटले की, तो व्यक्ती नशेत आहे, त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्या व्यक्तीने माझ्याविरोधात तक्रार दिली. मात्र, ही घटना थोडी भीतीदायक आहे कारण माझ्या कारला धडक बसली ज्यामुळे माझ्या स्वत: च्या कारचे बरेच नुकसान झाले.

ही घटना घडली तेव्हा मी शूटिंगला जात होतो म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तोच माझा सर्वात मोठा मूर्खपणा ठरला. मी गाडीची धडक झाल्याबरोबरच पोलिस स्टेशनमध्ये जायला पाहिजे होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी पुणे-सोलापूर महामार्गावर रात्री साडेदहा वाजता महेश मांजरेकर आणि दुसऱ्या एका कारमध्ये धडक झाली आहे.


संबंधित बातम्या : 

Nilesh Sable | ‘कॅप्टन ऑफ द शिप’ डॉ.निलेश साबळेंची इन्स्टाग्रामवर एंट्री, सोशल मीडियावर दिसणार ‘चला हवा येऊ द्या’ची हवा!

Marathi Serial : ‘शिक्षक ते अभिनेता…’,वाचा रघू म्हणजेच संचित चौधरीचा थक्क करणारा प्रवास

(Against actor Mahesh Manjrekar Filed a crime at the police station)