AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजपाल यादव आणि दुसऱ्या बायकोमध्ये किती वर्षांचं अंतर, लग्नाच्या विरोधात होते सासू – सासरे… अभिनेत्याचा मोठा खुलासा

Rajpal Yadav Love Life : राजपाल यादव याचं खासगी आयुष्यावर मोठा खुलासा... अभिनेता आणि दुसऱ्या बायकोमध्ये किती वर्षांचं अंतर, लग्नाच्या विरोधात सासू - सासरे असताना कसं जमलं..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राजपाल याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

राजपाल यादव आणि दुसऱ्या बायकोमध्ये किती वर्षांचं अंतर, लग्नाच्या विरोधात होते सासू - सासरे... अभिनेत्याचा मोठा खुलासा
अभिनेता राजपाल यादव
| Updated on: Apr 01, 2026 | 8:36 AM
Share

Rajpal Yadav Love Life : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राजपाल यादव चेक बाऊंस प्रकरणी चर्चेत होता. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राजपाल याने नवीन सुरुवात केली आहे. राजपाल लवकरच अभिनेता अक्षय कुमारा स्टारर ‘भूत बंगला’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या राजपाल ‘भूत बंगला’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.. प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. राजपाल याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. पण दुसरी बायको राधा हिने कधीच अभिनेत्याची साथ सोडली नाही. तसं पाहायला गेलं तर, दोघांची लव्हस्टोरी कोणत्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. सध्या सर्वत्र रााजपाल यादव याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘माझी आणि राधाची लव्हस्टोरी काही सोपी नव्हती… नात्याला पती – पत्नीचं नाव देण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला. अभिनेत्याची बोयको राधा म्हणते, ‘सुरुवातीला लग्नासाठी माझ्या आई – वडीलांचा नकार होा… कारण आमच्यामध्ये 13 वर्षांचं अंतर आहे… पण नंतर त्यांनी लग्नासाठी परवानगी दिली…’

राधा पुढे म्हणाली, ‘मी कॅनडा येथील आहे… राजपाल एका सिनेमाच्या शुटिंगसाठी कॅनडा येथे आलेला. आमची ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली. तेव्हा राजपाल माझ्या आई – वडिलांना देखील भेटायला आलेला… पण आमचं लग्न होईल अशी कल्पना देखील आम्हाला नव्हती… जवळपास 10 महिने आम्ही लॉग्न डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये होतो… त्यानंतर 2003 मध्ये जेव्हा मी भारतात आले तेव्हा आम्ही लग्न केलं… ‘

राजपाल यादव याने लग्नानंतरच्या आयुष्यावर चर्चा केली आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केला. अभिनेता म्हणाला, “मी राधाला लग्नानंतर तिचा शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. राधाने तिची सर्व स्वप्ने पूर्ण केली आणि इंटिरियर डिझाइनचं शिक्षण घेतलं. तिने लंडन आणि दुबई येथे प्रशिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण घेतलं आणि अभ्यासक्रम पूर्ण केला. सांगायचं झालं तर, हा निर्णय केवळ तिची मेहनतच नव्हे, तर त्या जोडप्याची विचारसरणीही दर्शवते. लग्न हे प्रगतीचं स्थान असलं पाहिजे.

एवढंच नाही तर, अनेक मुलाखतींमध्ये राजपाल यादव याने पहिल्या बायकोबद्दल देखील खुलासा केला. लग्नाच्या काही महिन्यांनंतर अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. मुलीला जन्म दिल्यानंतर राजपाल याच्या पहिल्या पत्नीने अखेराचा श्वास घेतला. त्यानंतर राजपाल याने राधा हिच्यासोबत लग्न केलं. राधा हिने प्रत्येक कठीण काळात राजपाल याला साथ दिली… आज अभिनेता त्याच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता