AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोट? छे.. अभिषेक-ऐश्वर्याचा हा नवीन व्हिडीओ पाहून विभक्त होण्याच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम

एका मुलाखतीत अभिषेकने पत्नी ऐश्वर्याचं तोंडभरून कौतुक केलं. “कधी कधी तुम्ही कामात इतके व्यस्त असता की स्वत:साठीही वेळ नसतो. ऐश्वर्याच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी असते. मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तिचे आभार मानतो. ती सर्व काम नि:स्वार्थपणाने करते,” असं तो म्हणाला.

घटस्फोट? छे.. अभिषेक-ऐश्वर्याचा हा नवीन व्हिडीओ पाहून विभक्त होण्याच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम
अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 05, 2023 | 9:43 PM
Share

मुंबई : 5 डिसेंबर 2023 | गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची जोरदार चर्चा आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचा विचार करत असल्याचंही म्हटलं जात होतं. आता या सर्व चर्चांना खुद्द अभिषेक आणि ऐश्वर्याने पूर्णविराम दिला आहे. ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं. यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्यासुद्धा एकत्र दिसले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हेसुद्धा उपस्थित होते.

‘द आर्चीज’च्या प्रीमिअर कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी कॅमेरासमोर एकत्र मिळून फोटोसाठी पोझसुद्धा दिले. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बिग बींचा नातू आणि श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबीयांसाठी हा कार्यक्रम खूपच खास आहे. या कार्यक्रमात आराध्यानेही सर्वांचं लक्ष वेधलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ऐश्वर्या आणि आराध्याकडे दुर्लक्ष केलं जातंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘ऐश्वर्या आणि अभिषेकने कधीच घटस्फोट करू नये अशी माझी इच्छा आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खानसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. इतकंच नव्हे तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची दुसरी मुलगी खुशी कपूरसुद्धा या चित्रपटातून इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवतेय. त्यामुळे या चित्रपटात बरेच स्टारकिड एकत्र दिसणार आहेत.

2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये फक्त चांगली मैत्री होती. त्यानंतर हळूहळू भेटीगाठी वाढल्या आणि 2006-2007 पर्यंत त्यांनी एकमेकांना डेट केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक आणखी वाढत गेली आणि त्याचवेळी ऐश्वर्या-अभिषेक एकमेकांच्या प्रेमात पडले.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.