ऐश्वर्याची उडवली खिल्ली, आराध्याची केली नक्कल; तिच्यावर भडकले चाहते, म्हणाले ‘कोणीही छपरी येऊन..’

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या यांची नक्कल करत खिल्ली उडवणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर चाहते भडकले आहेत. "आतो कोणीही छपरी येऊन ऐश्वर्याची मस्करी करणार का", असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

ऐश्वर्याची उडवली खिल्ली, आराध्याची केली नक्कल; तिच्यावर भडकले चाहते, म्हणाले कोणीही छपरी येऊन..
ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 17, 2024 | 10:15 AM

अभिनेत्री ऐश्वर्या रायचे केवळ जगभरातच नाही तर परदेशातही असंख्य चाहते आहेत. असं असलं तरी ऐश्वर्याच्या सध्याच्या फॅशन आणि हेअरस्टाइलवरून अनेकजण ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोणत्याही कार्यक्रमात, पार्ट्यांमध्ये किंवा फॅशन शोमध्येही ऐश्वर्या सतत एकाच हेअरस्टाइलमध्ये दिसून येते. यामुळे नेटकरी तिला ट्रोल करतात. अशाच एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने तिच्या एका व्हिडीओमुळे ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांची नक्कल करून दाखवली. मात्र हा व्हिडीओ ऐश्वर्याच्या चाहत्यांना अजिबात रुचला नाही. त्यांनी इन्फ्लुएन्सरकडे तो व्हिडीओ डिलिट करण्याची मागणी केली.

दुबईची डिजिटल क्रिएटर शिद्रा हफीजने ऐश्वर्या आणि आराध्याची खिल्ली उडवत इन्स्टाग्रावर एक रील व्हिडीओ बनवला आहे. ऐश्वर्याची ठरलेली हेअरस्टाइल, त्यावर ठरलेली नेहमीची गुलाबी किंवा लाल लिपस्टिक आणि कपडे यांवरून शिद्राने तिची खिल्ली उडवली आहे. इतकंच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमात किंवा एअरपोर्टवर ऐश्वर्या सतत तिच्या मुलीचा हात धरून चालताना दिसते. यावरूनही तिने मस्करी केली आहे. ऐश्वर्या आणि आराध्या ज्याप्रकारे एकमेकींचा हात धरून चालतात, त्यावरून तिने ही नक्कल केली आहे. शिद्राच्या या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी आराध्याची नक्कल करताना दिसून येत आहे. तर शिद्रा तिचा हात धरून चालते आणि दुसऱ्या हाताने पापाराझींना अभिवादन करते.

ऐश्वर्या आणि आराध्याची ही नक्कल पाहून चाहते शिद्रावर खूपच नाराज झाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तू ऐश्वर्याच्या नखासमानही नाहीस. आता कोणीही येऊन मिस वर्ल्डचा किताब जिंकलेल्या ऐश्वर्याची खिल्ली उडवणार का’, असा सवाल एकाने केला. तर ‘आम्हाला ऐश्वर्यावर खूप अभिमान आहे. अशा पद्धतीचे व्हिडीओ बनवून नेटकऱ्यांचं लक्ष वेधणं सोडून दे. तुझ्याकडे कंटेंटसाठी दुसरा कोणताच विषय नाही का’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘ती तुझ्यापेक्षा लाख पटींनी चांगली आहे. ती मिस वर्ल्ड आहे, तू स्वत:ला आरशात पाहिलंस का’, अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.