ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात ‘रोज’ भांडणे, अखेर अभिषेक याने ‘तो’ खुलासा करत, पत्नीचे सत्य..

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा या सुरू आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच भाष्य केले नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात रोज भांडणे, अखेर अभिषेक याने तो खुलासा करत, पत्नीचे सत्य..
| Updated on: Dec 30, 2023 | 12:03 PM

मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. हेच नाही तर थेट यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा ही सतत रंगताना दिसत आहे. यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहते हे हैराण होताना दिसत आहेत. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा विवाहसोहळा हा पार पडला. लग्नाच्या अगोदर यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले. अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या काही वर्षे अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. चाहत्यांना ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी प्रचंड आवडते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक जुनी मुलाखत ही प्रचंड चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना ऐश्वर्या राय ही दिसत आहे. विशेष म्हणजे या मुलाखतीच्या वेळी अभिषेक बच्चन हा देखील उपस्थित दिसत आहे. अभिषेक यानेही काही भाष्य केले.

या मुलाखतीच्या वेळी बोलताना ऐश्वर्या राय ही म्हणाली की, आमचे दररोजच भांडणे होतात. ऐश्वर्या राय हिचे हे बोलणे ऐकून सर्वजण हे हैराण झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर थेट यावेळी अभिषेक बच्चन हा स्पष्टीकरण देताना दिसला. अभिषेक बच्चन म्हणाला की, भांडणे म्हणजे भांडणे नसतात. काही गोष्टींवरून आमच्यामध्ये मतभेद होतात.

दररोज कारणे वेगळी असतात. मात्र, त्याशिवाय आमचा दिवसच पूर्ण होत नाही. पुढे अभिषेक बच्चन म्हणाला की, विषय कोणत्याही असो आणि वादाचे कारण काहीही असो आणि चूक कोणाचीही असो शेवटी माफी ही मलाच मागावी लागते. माझा एक नियम आहे की, भांडणे मिटवल्याशिवाय मी रात्री कधीच झोप नाही. मलाच दररोज माफी ही मागावी लागते.

मुळात म्हणजे चूक कोणाची हा विषय नसतो. मी कायमच माफी मागतो. पुढे अभिषेक म्हणाला की, महिला या कायमच बरोबर असतात, हे ज्याला समजते त्याचे आयुष्य चांगले राहते. यामुळेच कधीही आपली चूक मान्य करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे ठोस पुरावे असतील तरीही तुम्हालाच माफी मागावी लागेल हाच नियम आहे. आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची ही जुनी मुलाखत चर्चेत आलीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us