जगात हाहाकार, फ्लायदुबईच्या घटनेबद्दल इस्त्रायलचा मोठा दावा, तो दहशतवादी हल्लाच..
Flydubai Smit Machchhar Live Updates : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिट धक्कादायक घटना घडली. को पायलटनेच विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. त्यातच आता अजून धक्कदायक माहिती पुढे येतंय, ज्याने एकच खळबळ उडाली.

बुधवारी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिट धक्कादायक घटना घडली. को पायलटनेच विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी असतानाही स्मित मच्छार यांनी आपत्कालीन संदेश पाठवली. यासोबतच त्यांनी जखमी असतानाही कॉकपिटचा दरवाजा उघडला. ज्यानंतर प्रवाशांनी को पायलटला पकडून ठेवले आणि पायलट स्मित गंभीर जखमी असतानाही त्यांनी सुरक्षित विमान उतरवले. विमानाने सौदी अरेबियातील ताबुक विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. विमानात असलेल्या सर्व 174 प्रवाशांची सुखरूपता असल्याचे वृत्त आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या म्हणण्यानुसार, सह-वैमानिकाने कथितरीत्या मुख्य वैमानिकावर हल्ला केला. विमान पाडण्याचा प्रयत्न केला.
विमान ट्रॅकिंगच्या आकडेवारीनुसार, हे विमान 30 सेकंदात सुमारे 14000 फूट खाली आले. ज्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले होते. त्यातच आता इस्त्रायलने जगाची झोप उडवणारा खुलासा केला. ज्याने जगात एकच खळबळ उडाली. फ्लायदुबईच्या 1073 क्रमांकाच्या विमानाचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न होता. तो भारतीय पायलटने हानून पाडला.
ओमानी वैमानिकाची सर्वप्रथम साैदी अरेबियातील यंत्रणांकडून चाैकशी केली जाईल. प्राथमिक तपास हा साैदी अरेबियाच करेल. इस्रायलने फ्लायदुबई विमानाच्या घटनेचे वर्णन दहशतवादी हल्ला म्हणून केले. इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी या घटनेचे वर्णन जिहादी दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असे केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पायलट स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला.
को पायलटने हा हल्ला केल्याचे आणि ही घटना धार्मिक कट्टरतेचे प्रकरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इस्त्रायलने दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले. इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. इस्त्रायल आणि अमेरिका एका बाजूला मिळून इराणसोबत युद्ध लढत आहे. इस्त्रायल आणि इराण यांच्यात तणाव काही महिन्यांपासून बघायला मिळतोय. त्यातच ओमानच्या को पायलटने इस्त्रायली नागरिक जास्त प्रमाणात असलेले विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. एका भारतीय पायलटने हे करण्यापासून रोखले.
