लग्नाची अंगठी, भगवद्गीतेतील श्लोक असलेली बनारसी ब्रोकेड कॅप; कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने ग्लॅमरस लूकसोबत दिली संस्कृतीची झलक

ऐश्वर्या रायने पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या दिवशी साडी आणि लाल सिंदूरने तिने सर्वांचं लक्ष वेधलं तर दुसऱ्या दिवशी ग्लॅमरस लूकसोबत भगवद्गीतेतील श्लोकासह भारतीय संस्कृतीचीही झलक दिली.

लग्नाची अंगठी, भगवद्गीतेतील श्लोक असलेली बनारसी ब्रोकेड कॅप; कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने ग्लॅमरस लूकसोबत दिली संस्कृतीची झलक
Image Credit source: instagram
| Updated on: May 23, 2025 | 12:07 PM

गेल्या 23 वर्षांपासून ऐश्वर्या राय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचे आकर्षण कायमच राहिलं आहे. अशा परिस्थितीत, दरवर्षी तिच्या लूकबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. यावेळी त्या ऐश्वर्याने यावेळी सुंदर साडी आणि सिंदूर लावून रेड कार्पेटवर प्रवेश करताच सर्वजण तिच्याकडे पाहत राहिले. तिच्या या लूकची चर्चा अजूनही होत आहे.

भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लूकने ऐश्वर्याने सर्वांची मने जिंकली

तर, दुसऱ्या दिवशी देखील ऐश्वर्याच्या सुंदर आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लूकने पुन्हा सर्वांना तिचं कौतुक करण्याची संधी दिली. साडीनंतर, ऐश्वर्या 22 मे रोजी काळ्या रंगाचा शिमरी गाऊन घालून रेड कार्पेटवर आली. त्यासोबत तिने एक स्टायलिश बनारसी ब्रोकेड कॅप घातली होती, ज्यावर श्रीमद् भगवद्गीतेतील एक श्लोक लिहिलेला होता. ज्यात तिने पाश्चात्य पोशाखांसह भारतीय संस्कृतीचे सुंदर झलक दाखवली. एवढंच नाही तिच्या हातातील अंगठीनेही सर्वांचे लक्ष वेधले.कारण ती तिच्या लग्नातील अंगठी आहे. जी V आकाराची आहे. लग्नाची अंगठी तिच्या पाश्चात्य लूकचे आकर्षण बनली.जिथे गेल्या काही महिन्यांपासून तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या त्या सर्वच चर्चांनसाठी हे चोख उत्तर आणि पूर्ण विराम होता.

‘हॅरिस ऑफ क्लॅम’ गाऊन

ऐश्वर्याचा साडी लूक अजूनही लोकांकडून कौतुकास्पद आहे. आता तिला रेड कार्पेटवरील तिच्या दुसऱ्या लूकसाठी देखील तेवढीच प्रशंसा मिळत आहे. पहिल्या दिवशी तिने मनीष मल्होत्राची कस्टम साडी घातली होती आणि दुसऱ्या दिवशी डिझायनर गौरव गुप्ताने डिझाईन केलेला ‘हॅरिस ऑफ क्लॅम’ गाऊन घातला होता. या कपड्यांची डिझाईन तिच्यासाठीच खास बनवलेले आहेत. जे ड्रेप स्टाईलमध्ये डिझाइन केलेले आहे आणि काही आध्यात्मिक तपशीलांसह तयार केले आहेत जे तिच्या सौंदर्यात भर घालतात.


बनारसी ब्रोकेड कॅपवरील गीतेतील श्लोक नेमका कोणता?

दरम्यान ऐश्वर्याने घातलेल्या बनारसी ब्रोकेड कॅपवरील गीतेतील श्लोक होता “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भुर्म ते संगोस्तवकर्मणि ||” या श्लोकाचा अर्थ असा आहे की, तुमचे कर्तव्य करा, फळांची इच्छा करू नका. केवळ परिणामांच्या इच्छेने तुमचे कर्तव्य पार पाडण्याचा हेतू ठेवू नका आणि काम न करण्यात तुम्हाला कोणतीही आसक्ती असू नये.

लाल रंगाच्या लिपस्टीकने बोल्ड ओठांचा तिचा लूक

काळ्या गाऊनसह तिने लावलेल्या लाल रंगाच्या लिपस्टीकने बोल्ड ओठांनी तिचा लूक देखील हायलाइट होत होता. तिचा मेकअप तिच्या लूकला अगदी साजेसा होता. गाऊनमधील ऐश्वर्याची स्टाईल डोक्यापासून पायापर्यंत ग्लॅमरस दिसत होती एवढं नक्की.