अभिषेक बच्चन सोबत घटस्फोटाच्या चर्चा, ऐश्वर्या रायने असं केलं ज्यामुळे सर्वांची बोलती झाली बंद, व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai - Abhishek Bachchan: अभिषेक बच्चन सोबत घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, दरम्यान ऐश्वर्या राय हिने असं केलं तरी काय? ज्यामुळे सर्वांची बोलती झाली बंद, गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा...

अभिषेक बच्चन सोबत घटस्फोटाच्या चर्चा, ऐश्वर्या रायने असं केलं ज्यामुळे सर्वांची बोलती झाली बंद, व्हिडीओ व्हायरल
Aishwarya Rai - Abhishek Bachchan
| Updated on: Sep 23, 2024 | 12:45 PM

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अभिषेक – ऐश्वर्या यांचा घटस्फोट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकताच, ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत SIIMA मध्ये पोहोचली होती. तेव्हा ऐश्वर्या हिच्या हातात अंगठी दिसली नाही. ही गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आली आणि ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. पण आता पुन्हा ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एका आठवड्यानंतर ऐश्वर्या हिने घटस्फोटाच्या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पॅरिस फॅशन विकमध्ये पोहोचली होती. फॅशन विक दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, ऐश्वर्या हिला नवऱ्यासोबत आणि कुटुंबासोबत फार कमी स्पॉट केलं जातं. पण अभिनेत्री मुलीसोबत कायम दिसते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

 

Aishwarya rai back with her wedding ring at Paris fashion week.
byu/FilmyInsaan inBollyBlindsNGossip

 

Reddit वर ऐश्वर्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पॅरिस फॅशन विक दरम्यान ऐश्वर्या सतत रिंग फ्लॉन्ट करताना दिसली. अभिनेत्रीच्या व्हिडीओ नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तिला असं वाटतं की सर्वांनी तिची अंगठी पाहायला हवी’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रिंग फ्लॉन्ट करत अभिनेत्री पोज देत आहे.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ती लग्नाची अंगठी नसून, लग्न झालेल्या महिला अशी अंगठी घालतात…’ सध्या सर्वत्र ऐश्वर्या हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

कुठे आहे अभिषेक बच्चन?

ऐश्वर्या राय कायम तिच्या कर्यक्रमांमुळे प्रवास करत असते. यावेळी अभिनेत्री सोबत कधीच अभिषेक बच्चन नसतो. कोणत्याही कार्यक्रमात ऐश्वर्या लेका आराध्या हिच्यासोबत पोहोचते. त्यामुळे देखील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगलेली असते.

ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर आणि संपूर्ण जगभरात ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.