AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai: 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल ऐश्वर्या राय? सुरकुत्या पडूनही सौंदर्य असेल कायम

Aishwarya Rai: वयाच्या 80 व्या वर्षी कशी दिसेल अभिनेत्री ऐश्वर्या राय, व्हिडीओ पाहून म्हणाल..., अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही सौंदर्य असेल कायम, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐशर्या हिच्या सौंदर्याची चर्चा...

Aishwarya Rai: 80 वर्षांची झाल्यावर कशी दिसेल ऐश्वर्या राय?  सुरकुत्या पडूनही सौंदर्य असेल कायम
| Updated on: Sep 23, 2024 | 10:38 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ऐश्वर्याने स्वतःच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता ऐश्वर्या हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या वयाच्या 80 व्या वर्षी कशी दिसेल… दाखवलं आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत. AI टूलच्या मदतीने व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. ऐश्वर्या रायचे काही फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत जे AI ने तयार केले आहेत. त्यात 80 वर्षांच्या ऐश्वर्याचा तिच्या बालपणापर्यंतचा लूक दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर active.suresh नावाच्या एका नेटकऱ्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय म्हातारपणी कशी दिसेल आणि लहानपणी कशी दिसत होती…. हे व्हिडीओमध्ये दाखवलं आहे. वयाच्या 80 व्या वर्षी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असल्या तरी अभिनेत्रीचं सौंदर्य कायम असेल. सध्या सर्वत्र व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या राय हिचा सर्वत्र बोलबाला होता. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक दिग्दर्शक, निर्माते ऐश्वर्या हिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. अनेक प्रसिद्ध अभिनेत्यासोबत ऐश्वर्या राय हिने स्क्रिन शेअर केली आहे. आज ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना ऐश्वर्या तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली. अनेक प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगली. पण ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याला अनेक वर्ष डेट केल्यानंतर 2007 मध्ये लग्न केलं.

काही खास पाहुणे आणि कुटुंबियांच्या मदतीने ऐश्वर्या हिने अभिषेक याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने 2007 मध्ये लेक आराध्या बच्चन हिला जन्म दिला. आता अभिनेत्री लेकीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. दरम्यान, ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा