
बॉलिवूडमधील अनेक जोड्या अशा आहेत ज्यांचे अफेअर्स खूप चर्चेत आले. पण त्यांचे नाते लग्नापर्यतं जाऊ शकले नाही. त्यातीलच एक जोडी म्हणजे ऐश्वर्या-सलमान खानचे अफेअर. या जोडीच्या नात्याची आजही तेवढीच चर्चा होते. जुने किस्से, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. “हम दिल दे चुके सनम” चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले आणि काही वर्षांतच ते वेगळे देखील झाले.
व्हिडीओमध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात असलेले दिसत आहे.
ऐश्वर्याच्या लग्नानंतर सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. पण कधी तेवढी चर्चा झाली नाही. आताही सलमान खान आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो की एका चित्रपटाच्या सेटवरील आहे आणि या व्हिडीओमध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात असलेले दिसत आहे. त्यांचे प्रेम आणि मैत्रीपण दिसत आहे.
सलमान आणि ऐश्वर्या सेटवर खूप मजा करायचे
व्हायरल झालेला व्हिडीओ हा 1999 मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवरील आहे, जिथे सलमान आणि ऐश्वर्या राय परिपूर्ण प्रेमात दिसत आहेत. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता आणि हा सलमान आणि ऐश्वर्याचा एकत्र शेवटचा चित्रपट होता. चित्रपटाच्या सेटवरील या क्लिपवरून सलमान आणि ऐश्वर्या सेटवर एकमेकांसोबत किती कम्फर्ट होते हे स्पष्टपणे दिसून येते.
सलमान आणि ऐश्वर्याचे नाते किती वर्ष होते?
सलमान आणि ऐश्वर्याचे नाते फक्त तीन ते चार वर्षे टिकले आणि नंतर ते वेगळे झाले. अलिकडेच प्रसिद्ध गीतकार समीर अंजान यांनी खुलासा केला होता की, सलमान खान ‘तेरे नाम’ चित्रपटात ऐश्वर्याची आठवण येऊन रडायचा. हा काळ सलमान आणि ऐश्वर्याचे नुकतेच ब्रेकअप झाले होते तेव्हाचा होता. ‘तेरे नाम’ चित्रपटाचे शीर्षक गीत देखील सलमानच्या प्रेमकथेवर आधारित होते आणि चित्रपटातील आणखी एक गाणे, “क्यों किसी को वफा के बदले वफा नही मिलती”, हे देखील सलमानच्या दुःखद प्रेमकथेवर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.