धुरंधरमध्ये अक्षय खन्ना रणवीर सिंगवर पडला भारी; प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर अक्षय खन्नाला अवॉर्ड देण्याची मागणी

अक्षय खन्नाने 'धुरंधर' चित्रपटात साकारलेला 'रहमान डकोइट' प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. रणवीर सिंगच्या भूमिकेपेक्षाही अक्षयचा अभिनय अधिक प्रभावी ठरला, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याला अवॉर्ड देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

धुरंधरमध्ये अक्षय खन्ना रणवीर सिंगवर पडला भारी; प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर अक्षय खन्नाला अवॉर्ड देण्याची मागणी
akshay khanna outshines ranveer singh in dhurandhar, audience demands award for akshay khanna on social media
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 05, 2025 | 6:28 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2025 मधील सर्वात चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर. माधवन मुख्य भूमिकेत आहेत. ‘धुरंधर’ या चित्रपटाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या सकारात्मक आहे. याचा अर्थ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी चित्रपटातील रणवीर सिंगच्या भूमिकेची सर्वाधिक चर्चा होत होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही त्याच्या भूमिकेला तेवढाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण त्याच्यापेक्षाही एका अभिनेत्याचा भूमिकेला सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे.

धुरंधरसाठी अक्षय खन्नाला अवॉर्ड देण्याची प्रेक्षकांची मागणी

धुरंधरमध्ये रणवीर सिंगवरही भारी पडलेला अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेल्या गँगस्टर रहमान डकोइटच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळाली आहे.चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एवढंच नाही तर अक्षयचा अभिनय प्रेक्षकांना एवढा आवडला की सोशल मीडियावर त्याला अवॉर्ड देण्याची मागणी करत आहेत.

अक्षय खन्ना हा एक उल्लेखनीय अभिनेता आहे. त्याने बॉलीवूडमध्ये नायक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती, परंतु आता त्याला खरी ओळख आणि लोकप्रियता मिळत आहे. त्याने बऱ्याच अशा भूमिका साकारल्या आहेत ज्या पाहून चाहत्यांनी खरोखंरच कौतुकासोबतच आश्चर्य व्यक्त केलं. अक्षय खन्नाने केलेल्या अशाच दमदार भूमिकांबद्दल जाणून घेऊ.

‘छावा’

अक्षय खन्नाने साकारलेली खलनायकाची भूमिकाही प्रेक्षक डोक्यावर घेताना दिसतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट. या चित्रपटात अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. निर्दयी आणि क्रूर सम्राटाच्या त्याच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

‘दृश्यम 2’

ब्लॉकबस्टर सस्पेन्स थ्रिलर ‘दृश्यम 2’ मध्ये अक्षय खन्ना एका हुशार पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जो अजय देवगणचे पात्र विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित एका कथित खून प्रकरणाचा तपास करतो. त्याची ही भूमिका ही नक्कीच हटके आणि त्याच्या शैलितून त्याने सादर केली.

‘दिल चाहता है’

दिल चाहता है फरहान अख्तरने दिग्दर्शित केला होता. यात आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होते. दिल चाहता है हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला बदलून टाकणाऱ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो.


‘हमराझ’

अब्बास-मस्तानच्या कल्ट थ्रिलर ‘हमराझ’ मध्ये अक्षय खन्नाने खलनायकाची भूमिका केली होती. ज्यामध्ये बॉबी देओल आणि अमिषा पटेल देखील होते. त्याचा अभिनय उल्लेखनीय होता. आणि अभिनयासोबतच त्याने केलेल्या डान्सचे देखील तेवढेच कौतुक झाले.

‘तीस मार खान’

2010 मध्ये अक्षय कुमारचा ‘तीस मार खान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात अक्षय खन्नाने अभिनेता आतिश कपूरची भूमिका साकारली होती, ज्याने पॉप संस्कृतीत लोकप्रियता मिळवली आहे. यात त्याची भूमिका काहीशी कॉमेडीकडे झुकणारी होती. पण त्याने ती देखील उत्तम प्रकारे साकारली.

‘बॉर्डर’

1197 मध्ये प्रदर्शित झालेला “बॉर्डर” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक मोठा ब्लॉकबस्टर ठरला. अक्षय खन्नाने या चित्रपटात एका तरुण लष्करी अधिकाऱ्याची भूमिका केली होती. सनी देओल, सुनील शेट्टी आणि इतर अनेक स्टार्स देखील या चित्रपटाचा भाग होते.या चित्रपटातील प्रत्येकाच्या भूमिका लक्षात राहण्यासारख्या आहेत. त्यातच अक्षय खन्नाच्या भूमिकेचंही कौतुक झालं होतं.