
मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अक्षय कुमार हा बाॅलिवूडचा असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून जलवा दाखवताना दिसत नाहीयेत. अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला.
विशेष बाब म्हणजे अक्षय कुमार हा सेल्फी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. मात्र, अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट फ्लाॅप गेला. अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला ओएमजी 2 हा चित्रपट देखील काही खास कमाई करू शकला नाही. अक्षय कुमार याला ओएमजी 2 हा चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या चित्रपटाचेही त्याने प्रमोशन केले.
शेवटी मोठ्या प्रयत्नानंतर ओएमजी 2 या चित्रपटाने 150 कोटींचा टप्पा पार केला. अक्षय कुमार याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या आगामी वेलकम 3 या चित्रपटाचे टिझर हे रिलीज झाला. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा हटके लूकमध्ये दिसला वेलकम 3 सोबतच आता चाहत्यांच्या भेटीला लवकरच त्याचा हेरा फेरी 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे.
हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा दिसणार नसल्याची जोरदार चर्चा होती. अक्षय कुमार याने एका कार्यक्रमात स्पष्ट केले की, मला हेरा फेरी 3 ची स्क्रीप्ट आवडली नसल्याने मी चित्रपटाला नकार दिला. यानंतर अक्षय कुमार याच्यावर निर्माते नाराज झाले. अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले.
कार्तिक आर्यन याने हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट देखील मागून घेतली असतानाच सर्वांनाच मोठा धक्का देत हेरा फेरी 3 चित्रपटाला अक्षय कुमार याने होकार दिला. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये हेरा फेरी 3 चा प्रोमो देखील शूट करण्यात आल्याचे सांगितले गेले. हेरा फेरी 3 ला अक्षय कुमार याने अचानकपणे होकार दिल्याने सर्वचजण हैराण झाले.
असे सांगितले जात आहे की, सतत चित्रपट फ्लाॅप जात असल्याने अक्षय कुमार याने वेलकम 3 आणि हेरा फेरी 3 चित्रपटासाठी फिस अत्यंत कमी घेतलीये. आपल्या फिसमध्ये त्याने मोठी कपात केलीये. अक्षय कुमार हा एका चित्रपटासाठी साधारणपणे 50 कोटी फिस घेतो. आता त्याने आपली फिस बऱ्यापैकी कमी केलीये.