Akshay Kumar | बलात्काऱ्यांना फाशी द्या, हाथरस प्रकरणावर भडकला अक्षय कुमार

ही क्रूरता कधी थांबणार? गुन्हेगारांना फाशी द्या, असे म्हणत अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपला संताप व्यक्त केला आहे

Akshay Kumar | बलात्काऱ्यांना फाशी द्या, हाथरस प्रकरणावर भडकला अक्षय कुमार
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 6:35 PM

मुंबई : उत्तर प्रदेशच्या हाथरस (Hathras) येथे एका 19 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कारची (Rape) घटना घडली होती. जखमी मुलीचा उपचार दरम्यान मंगळवारी (29 सप्टेंबर) मृत्यू झाला. बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही क्रूरता कधी थांबणार? गुन्हेगारांना फाशी द्या, असे म्हणत अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपला संताप व्यक्त केला आहे (Akshay Kumar Reacted on Hathras Gang Rape).

या घटनेवर दुःख व्यक्त करताना अक्षय कुमारने (Akshay Kumar) ट्विटद्वारे आपल्या उद्विग्न भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘संताप आणि मनःस्ताप. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण, कितीही क्रूरता. कधी थांबणार आहे हे सगळे? आपल्या कायद्याने आता आणखी कडक व्हायला पाहिजे की शिक्षा ऐकताच गुन्हेगार भीतीने थरथर कापला पाहिजे. गुन्हेगारांना फाशी द्या. महिलांच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी आवाज उठवूया, इतके आपण सगळेच करू शकतो’, अशा कडक शब्दांत त्याने आपला राग व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात घडली घटना

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार (gang-rape) झालेल्या 20 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिल्लीतील रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु होते. शरिरावर जखमा आणि ठिकठिकाणी फ्रॅक्चर्स झाल्याने मुलगी उपचारास प्रतिसाद देऊ शकली नसल्याचे सांगितले जात आहे.(Akshay Kumar Reacted on Hathras Gang Rape)

दिल्लीपासून सुमारे 200 किमीवर असलेल्या हाथरस (Hathras) गावात 14 सप्टेंबरला या मुलीवर चार ते पाच जणांनी बलात्कार (Rape) केला. तसा आरोप मुलीच्या भावाने केला होता. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.

पीडित मुलीच्या भावाच्या म्हणण्यानुसार, “माझा मोठा भाऊ, आई आणि बहीण शेतात गेले होते. माझा भाऊ गुरांसाठी चारा घेऊन समोर आला. माझी आई आणि बहीण काम करत होते. त्याचवेळी चार ते पाच जण गुपचूप आले. त्यांनी माझ्या बहिणीच्या गळ्यात ओढणी टाकून तिला शेजारच्या शेतात जबरदस्तीने घेऊन गेले. माझी बहीण गायब असल्याचे कळताच माझ्या आईने तिचा शोध घेतला. ती शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने तिच्यावर बलात्कार झाल्याचे माझ्या आईला समजले.”

(Akshay Kumar Reacted on Hathras Gang Rape)

संबंधित बातम्या : 

उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

विधवेवर सामूहिक बलात्कार, आमदारासह मुलगा आणि भाच्यावर गुन्हा दाखल

कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.