
राज्यात होणारे ऑनलाइन फ्रॉड आणि सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने गृह विभागाकडून महाराष्ट्रात ‘सायबर जागरूकता महिना’ साजरा केला जात आहे. सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, अभिनेता अक्षयकुमार व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, अक्षय कुमारने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. त्याच्या लेकीकडे न्यूड फोटोची मागणी झाली होती.
नेमकं प्रकरण काय?
अक्षय कुमार कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, मी अनेक गोष्टी लिहून आणल्या होत्या मात्र माझ्या आधी अनेक जण बोललेत तर बोलायला काहीच उरलं नाही. मला काही सांगायचं आहे जी एक घटना माझ्यासोबत घडली. माझी मुलगी एक आॅनलाइन गेम मोबाइलवर खेळत होती. त्यानंतर मॅसेजेस येत होते धन्यवाद, मस्त, चांगले खेळलात वैगरे. एक मॅसेज आला तुम्ही कुठून आहात? त्यानंतर आणखी एक मेसेज आला पुरुष आहात की महिला? मग समोरुन मॅसेज आला न्यूड फोटो पाठवा. तिने फोन बंद केला आणि माझ्या बायकोला सांगितले. इथून ह्या सर्व गोष्टी सुरु होतात. इथूनच सायबर क्राइमची सुरुवात होते. अनेक गोष्टी आणि केसेस तुम्ही स्वतः बघता.
वाचा: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम
अक्षयने केली विनंती
पुढे अक्षय विनंती करत म्हणाला की, “मुख्यमंत्री इथे बसले आहेत. शाळेत इतिहास, भूगोल, गणीत शिकतो. मात्र, सायबर क्षेत्रात जातो तेव्हा काहीच माहिती नसते. माझी विनंती आहे, शाळांमध्ये ७वी ते १० वी एक तास सायबर क्षेत्राचा असावा. स्ट्रीट क्राइमपेक्षा सायबर क्राइम वाढलं आहे.”
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सायबर गुन्हा रिव्हर्स करु शकत नाही. अशात जनजागृती महत्त्वाची आहे. आपण सायबर गुन्हे प्रिव्हेंट करु शकतो. मी युट्यूब ब्राऊज करत होतो, माझं भाषण मी उघडलं. बोलत मी होतो, मात्र शब्द माझे नव्हते. मी डॉ. शेट्टीचं औषध वापरलं, तुम्ही देखील वापरा, चांगलं आहे असं. माझ्याच आवाजातलं दुसरं भाषण दाखवलं जात होतं. लोकांना वाटतं होतं मीच ते खरं रेकमेंट करतोय, मात्र तसं नव्हतं. डिजिटल अरेस्ट संदर्भात आपण अव्हेअरनेट तयार करतोय. तरीही रोज एक केस आपल्याकडे येत आहे. चांगल्यात चांगले लोकं, मिलिट्रीतला निवृत्त अधिकारी देखील यात अडकलेले बघितले. अशात हे फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आता परिस्थिती अशी आहे की माझ्या फोननंबरवरुन अक्षयला फोन जाऊ शकतो आणि निमंत्रण दिलं जाऊ शकतो अमुक कार्यक्रमाला या. आणि त्यांना कळणार देखील नाही की मी तो नव्हतो.”