AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमागे कोणाचा हात? ट्विंकल खन्ना हिला कॅब ड्रायव्हरने सांगितलं सत्य

Twinkle khanna on Sushant Singh Rajput | जेव्हा कॅप ड्रायव्हरने ट्विंकल खन्ना हिला सांगितलं होतं सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचं सत्य, अभिनेत्याच्या मृत्यूमागे कोणाचा होता हात? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ट्विंकल खन्ना हिच्या वक्तव्याची चर्चा...

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमागे कोणाचा हात? ट्विंकल खन्ना हिला कॅब ड्रायव्हरने सांगितलं सत्य
| Updated on: Apr 23, 2024 | 9:39 AM
Share

अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना पुन्हा एकदा तिच्या सडतोड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ट्विंकल खन्ना हिने एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या स्तंभात अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. एक काळ असा होता जेव्हा ट्विंकल खन्ना हिने भारताचा सर्वात मोठा शत्रू अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यापार्टीमध्ये डान्स केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ट्विंकल म्हणाली, फेक न्यूजचा प्रभाव लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांवर होत असतो. यावेळी अभिनेत्रीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाबद्दल देखील मोठं सत्य सांगितलं..

वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या स्तंभात ट्विंकल खन्ना म्हणाली, ‘आपण पूर्वी देखील फेक न्यूजची पूर्ण सीरिज पाहिली आहे. एडिट केलेल्या फोटोंपासून, ज्यामध्ये विरोध प्रदर्शन सुरु असताना फोगट यांचा हसताना फोटो व्हायरल झाला होता. कोरोना व्हायरसच्या खऱ्या कारणांवर देखील अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या…’

पुढे सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूवर देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं. चेन्नई याठिकाणी कॅब ड्रायव्हरसोबत झालेला संवादाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘ड्रायव्हर म्हणाला होता, सुशांत याच्या मृत्यूमागे तीन खान आहेत. व्हाट्सऍप आणि यूट्यूबच्या माध्यमातून ड्रायव्हरला माहिती मिळाली होती आणि ती माहिती त्याला सत्य वाटली होती…’

पुढे ट्विंकल हिने ड्रायव्हरला विचारलं, ‘तुम्हाला अशा विचित्र आयडिया येतात तरी कशा? यावर ड्रायव्हर माघार घेत म्हणाला, तुम्ही बरोबर आहात सुशांतच्या मृत्यूमागे तीन नाही तर, एकच खान आहे..’ ड्रायव्हरच्या वक्तव्यानंतर विनोदी अंदाजात अभिनेत्री म्हणाली, ‘पूर्वी आपल्याला योग्य माहिती मिळत नव्हती..’

‘कुठे काय सुरु आहे आपल्याला माहिती देखील पडत नव्हतं. आपल्याकडे फक्त रेडिओ असायचे. त्यानंतर टीव्ही आला, आता देखील आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात. पण आता तर . व्हाट्सऍप आणि यूट्यूबमुळे लोकांपासून काही लपवलं जाऊ शकत नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

ट्विंकल खन्ना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ट्विंकल खन्ना फक्त अभिनेत्री नाहीतर, उत्तम लेखिका देखील आहे. 2015 मध्ये ट्विंकल हिचं पहिलं पुस्तक ‘मिसेज फनीबोन्स’ प्रकाशित झालं. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.